CET Exam Time Table 2021: शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ ते दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
चालू शैक्षणिक वर्षांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.
CET Exam Time Table 2021
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या परीक्षांसाठी प्रती दिवस जास्तीत जास्त प्रती दिन ५० हजार संगणक उपलब्ध करण्यात आलेले आहे. त्यातील २५ हजार संगणक अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांच्या संख्या व विद्यार्थ्यांनी दिलेल्या विकल्पानुसार सेशन संख्या निश्चित करण्यात येईल.
ही प्रवेश परीक्षा राज्य शासनाने कोविड-१९ बाबत जाहीर केलेल्या सूचनांच्या नियमांचे पालन करुन राबविण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिवशी मुंबईमध्ये लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे.
दरम्यान, परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी लोकल ट्रेन तिकीटासाठी परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवावे, असंही उदय सामंत यांनी सांगितले.
सदर सामाईक प्रवेश परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. तपशीलवार वेळापत्रक पाहण्यासाठी राज्य सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ mahacet.org वर भेट द्यावी.

#माहितीसाठी
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सीईटी कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभाागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक १५ सप्टेंबर, २०२१ ते दिनांक १० ऑक्टोबर, २०२१ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. pic.twitter.com/iGEnnFNLcT— Uday Samant (@samant_uday) September 7, 2021