Marathi Ukhane For Female – उखाणे हे भारतीय संस्कृतीत, विशेषत: महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये वापरल्या जाणार्या जोडप्याचे पारंपारिक रूप आहे. हे एखाद्याला आदराने संबोधित करण्यासाठी किंवा त्यांची स्तुती करण्यासाठी वापरले जाते आणि हे सामान्यतः विवाहसोहळा आणि इतर शुभ प्रसंगी वापरले जाते.
मित्रांनो आज आपण मराठी उखाणे या विषयावर मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हे उखाणे तुम्हाला आवडतील अशी आशा करून आपण उखण्यास सुरवात करूया. “Marathi Ukhane For Female”
Marathi Ukhane For Female
महिलांसाठी उखाणेची काही उदाहरणे आहेत :-
- पिवळा पितांबर , श्रीकृष्णाच्या अंगावर घातला ,
——–रावांच्या जीवनासाठी , स्त्री जन्म घेतला. - सासू सासऱ्यांनी काम केले , वर्क पुण्याचे ,
——-रावांना दान दिले , मला जन्माचे. - मोगऱ्याचा सुंगध घेताना , झाले मी धुंद
———रावांचे नाव घ्यायचा , लागला मला छंद. - नव्या घरात शोभून दिसतो , डायनिंग टेबल
——-रावांच्या नावासमोर , माझ्या नावाचे लागले लेबल. - चांगली पुस्तके आहेत , माणसांचे मित्र ,
——रावांच्या सहवासात रंगविते , संसाराचे चित्र. - मेहंदी रंगविते हाती , विडा रंगतो ओठी
—-रावांचा नाव घेते तुमच्यासाठी. - आशेच्या रंगमंचावर स्वप्नाचे पडसाद
———चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद. - ——-लेक , झाले —–सून
——-चे नाव घेते गृहप्रवेश करून ——
रावांच्या बरोबर मन गेले गांगरून
आई बाबांच्या आशीर्वादाची शान घेते पांघरून. - अंतरीचे गीत उमटले , शतजन्मीचे नाते जुळले ,
——–सह अंतरी प्रीतीचे फुल फुलले. - अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
——-रावांच्या नावावर भरते लग्नचुडा. ‘Marathi Ukhane For Female’
महिलांसाठी मराठी उखाणे
- अंजिठा वेरूळची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी ,
——नि आणलेली सुगंधी वेणी. - अरुणासह उषा आली , सोनियाची प्रभा पसरली
——–रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली. - अस्सल सोने चोवीस कॅरेट
——-अन माझे झाले आज मॅरेज. - आनंदाने भरला दिन हा लग्नाचा
——-रावांना घास देते गोड जिलेबीचा. - आई वडील सोडताना , पाऊल होतात कष्टी ,
——-रावांच्या संसारात करिन मे सुखाची सृष्टी. - आई, बाबा येते आशीर्वाद द्यावा
—–रावांच्या सहवास जन्मभर लाभावा. - आकाशात चमकतो तारा , अंगठीत चमकतो हिरा
——–राव पती मिळाले हाच भाग्योदय खरा. - आज आहे श्रावणी पोळा ,
——-च्या जीवावर शृंगार केले सोळा. - आता घास घेतला त्याला वेगळीच होती गाडी ,
——-ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी - आत्मरुपी करंडा , देहरूपी झाकण
——रावांचे नाव घेऊन बांधते मी कांकन [Marathi Ukhane For Female]
Marathi Ukhane
- आदर्श पती-पत्नी म्हणून सांगतात नल दमयंती ,
—–नी घास घ्यावा हि माझी पहिलीच विनंती. - आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर
आयुष्याच्या प्रवास करिन ——रावांच्या बरोबर. - आशीर्वादाची फुले वेचते वाकून
——चे नाव घेते तुमचा मान राखून. - आशेच्या रंगमंचावर स्वप्नाचे पडसाद
———चे नाव घेते तुम्हा सर्वांना आशीर्वाद. - इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर
——नाव घेते —–ची सिस्टर. - उन्हाळा चे दिवस आले झाली लग्ने सुरु ,
—–रावांचे नाव घेऊन केला आमचा संसार सुरु. - उभी होते मळ्यात ,
नजर गेली खळ्यात ,
हजारांची कंठी ,
——-रावांच्या गळ्यात. - ओम शब्दात आहे दिव्य शक्ती ,
——–रावांवर करते मी अमर प्रीती. - कळी हसेल फुल उमलेल , मोहरून येईल सुंगध ,
——-च्या सोबतीत , गवसेल जीवनाचा आनंद. - कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात
——–रावांचे नाव घेते माझ्या मनात. {Marathi Ukhane For Female}
मराठी उखाणे
- काचेच्या बशीत बदामाचा हलवा
———रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. - काचेच्या बशीत आमचे आंबे ठेवले कापून
——रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. - कुंकू लावत ठसठशीत , हळद लावते किंचित
——आहेस माझे पूर्व संचित. - चांदीच्या वाटीत साखरेचे खडे ,
——चं नाव घेते देवापुढे . - कपाळावर कुंकु ,
हिरवा चुडा हाती ,
माझे भाग्य किती,
——रावं माझे पति
सांगा संसार रुपी वेलीचा ,
गगनात गेला झुला ,
आशीर्वाद द्यावा मला. - हळद असते पिवळी , कुंकू असते लाल ,
——- साथ झाले जीवन खूशहाल . - रातराणीचा सुगंध , त्यात मंद वारा ,
—— रावांचे नांवाचा , भरला हिरवा चुडा . - समुद्राला आली भरती , नदीला आला पूर ,
——करता माहेर केले मी दूर . - गार गार माठामधले पाणी ताजे ताजे ,
——झाले राजे . - मंदिरात वाहाते , फुल आणि पान ,
—–रावांचे नांव घेते , ठेऊन सर्वांचा मान . - इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून
——-रावांचं नाव घेते
——-ची सून . - ताजमहाल बांधायला ; कारागीर होते कुशल ,
———-रावांचे नांव घेते , तुमच्या साठी स्पेशल . (Marathi Ukhane For Female)