मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? | marathi rajbhasha din in marathi

marathi rajbhasha din in marathi

marathi rajbhasha din in marathi :-आज मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. त्यानिमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. त्यांनी कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन केले.२१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी भाषा आणि महाराष्ट्राची साहित्य संस्कृती यासाठी कुसुमाग्रज यांनी महत्वाचे योगदान दिले.

जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल आदी त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट आदी गाजलेली नाटकं. १९७४ मध्ये नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

marathi rajbhasha din in marathi

कुसुमाग्रजांचा थोडक्यात परिचय

२७ फेब्रुवारी १९१२ : पुणे येथे जन्म
१९१९-२४ : प्राथमिक शिक्षण : पिंपळगांव बसवंत
१९२४-२९ : माध्यमिक शिक्षण : नाशिक येथे
१९२९ : बालमृबोधमेवामध्ये लेखन व कविता मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण : मुंबई विद्यापीठ
१९३० : हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व रत्नाकर मासिकात कवितांना प्रसिद्धी
१९३२ : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग
१९३३ : ध्रुव मंडळाची स्थापना. नवा मनू मध्ये वृत्तपत्रीय लेखन. जीवन लहरी या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
१९३४ : बी ए परिक्षा उत्तीर्ण (मराठी, इंग्रजी)
१९३६ : ३८ : गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश. सती सुलोचना कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका
१९३८ : ४६ : वृत्तपत्र व्यवसाय. साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग आदी. विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित (१९४२)
१९४४ : विवाह : पत्नीचे नाव मनोरमा
१९४६ : वैष्ण, पहिली कादंबरी, दूरचे दिवे पहिले नाटक
१९४६ : ४८ : साप्ताहिक स्वदेश संपादन
१९५० : लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन
१९५६ : अध्यक्षपद, मुंबई उपनगर साहित्य
१९५९ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह
१९६४ : अध्यक्षपद ४५ वे मडगाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन
१९६४ : जीवनगंगा नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन
१९६६ : राज्य पुरस्कार ययाति आणि देवयानी या नाटकास
१९६७ : राज्य पुरस्कार वीज म्हणाली धरतीला नाटकास
१९६४ : ६७ पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य
१९७० : अध्यक्षपद, मराठी नाट्य संमेलन, कोल्हापूर
१९७१ : नटसम्राट नाटकास राज्य पुरस्कार
१९६२ : ७२ अध्यक्ष सार्वजनिक वाचनालय. नाशिक
१९७२ : पत्नी मनोरमाबाईंचे निधन
१९७४ : नटसम्राट नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार
१९८५ : अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार
१९८६ : डी लिट पदवी : पुणे विद्यापीठ
१९८७ : अमृत महोत्सव
१९८८ : संगीत नाट्यलेखन अकादमी पुरस्कार
१९८८ : ज्ञानपीठ पुरस्कार
१९८९ : जागतिक मराठी परिषद मुंबई अध्यक्ष
१९९१ : पद्मभूषण
१९९६ : कुसुमाग्रज तारा
१० मार्च १९९९ : कुसुमाग्रजांचे निधन
२००३ : पोस्टाचे तिकीट प्रकाशन

1 thought on “मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो? | marathi rajbhasha din in marathi”

  1. Pingback: लाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र | Ladli Laxmi Yojana Maharashtra -

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!