Mallakhamb information in Marathi – ज्या खेळाला खेळांचा राजा म्हटले जाते असा खेळ म्हणजे मल्लखांब. या लेखातून आपण मल्लखांब या खेळाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या खेळाला मल्लखांब व मलखांब असेही म्हणतात. हा कसरतीचा खेळ प्रकार आहे. हा कुस्तीला पूरक असा खेळ प्रकार आहे.
मल्लखांब या खेळामुळे शारीरिक सुदृढता, चपळपणा, शरीरामध्ये लवचिकपणा या सर्व गुणांचा शरीरामध्ये विकास होतो. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत मल्लखांबाचा वापर करून हा खेळ खेळला जातो. मल्लखांब हा अतिशय प्राचीन प्रकार आहे पण, या खेळाचे लिखित साहित्य जास्त प्रमाणात उपलब्ध नाही. {Mallakhamb information in Marathi}
Mallakhamb information in Marathi
भारतात ओडिसा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरीच्या प्राचीन मंदिरा जवळ पंधराव्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. तिथे मल्लखांब खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्रामध्ये या खेळाची नोंद पेशवे काळात केलेली आढळते. बाळंभट देवधर यांनी मल्लखांब खेळाचे पुनरुज्जीवन केले.
बाळंभट देवधर हे दुसरे बाजीराव पेशवा यांचे व्यायाम शिक्षक होते. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी व्यायाम शाळा सुरू केल्या त्याचबरोबर त्या सर्व ठिकाणी मल्लखांबाची ही स्थापना केली. कुस्ती खेळताना पैलवानांमध्ये लवचिकपणा, चपळता व दम ही वाढावा यासाठी मल्लखांब खेळला जात असे. मल्लखांबाचे तीन भाग पडतात ते म्हणजे अंग, मान व बोंड. [Mallakhamb information in Marathi]
मल्लखांबाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत :-
- पुरलेला मल्लखांब
- टांगता मल्लखांब
- रीचा किंवा रोप मल्लखांब
मल्लखांब कसरतीचे 16 गुण
मल्लखांब कसरतीचे 16 गुण विकसित केले गेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत :-
- अढी :- हा मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार आहे. मल्लखांबावर विविध पकड घेऊन शरीर उलटे करून पोट मल्लखांबाच्या बाजूला येईल अशा प्रकारे पायांनी मल्लखांबाला विळखा घालण्याच्या क्रियेला अढी म्हणतात.
- तेढी :- मल्लखांबाला वेगवेगळ्या प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाला विळखा घालण्याच्या प्रक्रियेला तेढी असे म्हणतात.
- बगली :- मल्लखांब बगलेत वेगवेगळ्या पद्धतीने पकडून तेढी मारण्याच्या क्रियेला बगली असे म्हणतात.
- दसरंग :- मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली असे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे या क्रियेला दसरंग असे म्हणतात. (Mallakhamb information in Marathi)
- फिरकी :- दसरंग करीत असताना पायाची व हाताची पकड कायम मल्लखांबावर ठेवून शरीर एका बाजू वरून दुसऱ्या बाजूवर नेण्याच्या क्रियेला फिरकी असे म्हणतात.
- सुईदोरा :- हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला सुई दोरा असे म्हणतात. यामध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
- वेल :- हाताच्या व पायाच्या मदतीने हळूहळू वर चढत जाणे याला वेल असे म्हणतात.
- उतरती :- ही पद्धत वेलाच्या अगदी विरुद्ध आहे. यामध्ये हाताच्या व पायाच्या मदतीने हळूहळू खाली येणे या क्रियेला उतरती असे म्हणतात. “Mallakhamb information in Marathi”
- झाप :- मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून फारे, पतंगी अशा प्रकारातून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे या क्रियेला झाप टाकणे असे म्हणतात.
- फरारे :- मल्लखांबाला विविध प्रकारे धरून व पाय दूर करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला फरारे असे म्हणतात.
- आसने :- मल्लखांबाच्या सहाय्याने मल्लखांबाच्या अंगापासून ते बोंडापर्यंत विविध आसने करणे यास आसने असे म्हणतात.
- आरोहण उड्या :- मल्लखांबापासून काही अंतरावरून पळत येऊन पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे या क्रियेला आरोहण उडया असे म्हणतात.
- उडया :- मल्लखांबावरून विविध प्रकारे जमिनीवर दूर उड्या मारण्याच्या क्रियेला उडया असे म्हणतात.
- ताजवे :- मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकून मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ताजवे किंवा तराजू असे म्हणतात.
- सलाम्या :- अढीप्रमाणेच मल्लखांबावर वेगवेगळ्या पद्धतीने पकड घेऊन शरीर उलटे करून अढी न मारता जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला सलाम्या असे म्हणतात.
- चमत्कृतीजन्य कामे :- या सर्व प्रकारांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारखे नवीन प्रकार केले जातात. ‘Mallakhamb information in Marathi’
मल्लखांब विषयी आम्ही दिलेली माहिती तुम्हाला समजली व आवडली असेल अशी आशा आहे. ही माहिती संपूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मल्लखांबचे फायदे काय?
मल्लखांबावर खेळल्याने गती, प्रतिक्षेप, एकाग्रता आणि समन्वय विकसित होण्यास मदत होते. ऍथलेटिक्समध्ये, मल्लखांब ऍथलेटिक स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या ऍथलीटची सहनशक्ती, सामर्थ्य आणि तग धरण्याची क्षमता वाढवते.
मल्लखांबचे प्रसिद्ध खेळाडू कोण आहेत?
अश्विन चंदुलाल रावल. मल्लखांब इंडिया टीमचे संस्थापक आणि आधारस्तंभांपैकी एक. तो राष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब कलाकार आहे.