दुकानावरील बोर्ड किंवा पाट्या मराठीत करा नियम लागू

Make the board on the Shhop in Marathi – मुंबईतील दुकाने व आस्थापनांवरील नामफलक ठळक अक्षरात मराठी करण्यासाठी दिलेली 31 मेअखेरची मुदत संपली असली तरी बुधवार,1 जूनपासून कारवाई करणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिका प्रशासनाच्या पातळीवर या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून तपासणी आणि कारवाई सुरू होईल, अशी माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.

Make the board on the Shop in Marathi

त्यामुळे मुंबईतील दुकाने व आस्थापनांच्या मालकांना जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नामफलकाच्या पाट्या मराठी करण्यासाठी मुदत मिळाली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनात दुकाने, आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला.

याआधी 2018 च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असल्या दुकानांवर मराठी पाट्या असणेबंधनकारक होते, मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक केले असून त्याची कार्यवाही सुरू केली आहे.

दरम्यान, मद्यविक्रेत्या दुकानांनाही आता महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. याबाबतची कार्यवाही करण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

तपासणीसाठी कामगारामागे 75 इन्स्पेक्टर, दोन हजारांचा दंड

दुकाने-आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्याची कार्यवाही होत असल्याबाबतची पाहणी पालिकेच्या दुकाने व आस्थापने विभागाकडून प्रत्येक वॉर्डमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी 75 इन्स्पेक्टर आहेत.

शिवाय त्यांच्या सोबत एक सुविधाकारही राहील. पाहणीप्रसंगी मराठी पाटी लावण्यास नकार दिल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाईल. न्यायालयीन कारवाई नको असल्यास दंड भरावा लागेल. यामध्ये एका कामगारामागे दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयीन कारवाईनंतर वसूल केला जाईल.

असा आहे नियम

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम 2022 तील कलम 36 ‘क’ (1) च्या कलम 6 अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम 7 नुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने आस्थापने आहेत.  या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

Leave a Comment

close button