महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana in Marathi : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या कोविड-19 महामारी संकटामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांचा लाभ, लाभार्थी रुग्णांबरोबर सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि. 1 एप्रिल 2017 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता लाभार्थी नसलेल्या इतर रुग्ण देखील महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालयामध्ये कोविड -19 साठी उपचार उपलब्ध राहील.

याबाबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने विहित कार्यपद्धती नुसार कार्यवाही करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार संयुक्तपणे 60:40 च्या प्रमाणात अर्थ सहाय्य केले आहेत.

या योजनेमुळे सर्व गरिबांना वेळीच उपचार करता येऊ राहिले. या कोरोना काळात गरीबांसाठी फार महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे. या लेखामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे अटी, फायदे, उद्देश, लाभ, कागदपत्रे व संपर्क कुठे साधावा अशी इतर माहिती या लेखामध्ये सांगितलेली आहे

महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभार्थी व विमा

लाभार्थी

  • अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न)
  • शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
  •  शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, महिला आश्रमातील महिला, अनाथालय, वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिक तसेच अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब व अन्य लाभार्थी आहेत.

विमा संरक्षण

  •  या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये 1.50 लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.
  • मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष 2.50 लाखापर्यंत आहे.
  •  लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो. \’Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Marathi\’

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समाविष्ट उपचार

योजनेंतर्गत 30 विशेष सेवांतर्गत 971 उपचार व शस्त्रक्रिया तसेच 121 पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

  1. सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  2. काम, नाक घसा शस्त्रक्रिया
  3. नेत्ररोग शस्त्रक्रिया
  4. स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र
  5. अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
  6. पोठ व जठार शस्त्रक्रिया
  7. कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जरी
  8. बालरोग शस्त्रक्रिया
  9. प्रजनन व मूत्र रोग शस्त्रक्रिया
  10. मज्जातंतूविकृती शास्त्र
  11. कर्करोग शस्त्रक्रिया
  12. वैद्यकीय कर्करोग उपचार
  13. रेडीओथेरपी कर्करोग
  14. त्वचाप्रत्यारोपण शस्त्रक्रिया
  15. जळीत
  16. पॉलिट्रामा
  17. प्रोस्थेसिस
  18. जोखिमी देखभाल
  19. जनरल मेडिसिन
  20. संसर्गजन्य रोग
  21. बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  22. हृदयरोग
  23. नेफ्रोलोजी
  24. न्युरोलोजी
  25. पल्मोनोलोजी
  26. चर्मरोग चिकित्सा
  27. रोमेटोलोजी
  28. इंडोक्रायनोलोजी
  29. मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
  30. इंटरवेन्शनल रेडीओलोजी

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Benifits and Documents

लाभाचे स्वरूप : विमा संरक्षण

  • लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये 1.50 लाखापर्यंतचे विमा संरक्षण.
  • मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष 2.50 लाखापर्यंत आहे.
  • लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका किंवा अनेकांना योजनेचा लाभ घेता येतो.
  • रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्चाचा समावेश आहे.
  • रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर 10 दिवसापर्यंतच्या सेवा पॅकेजमध्ये समाविष्ट आहेत.

आवश्यक कागदपत्रे :

  • शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना त्यांचेकडील शिधापत्रिका
  • 7/12 उतारा
  • फोटो ओळखपत्र Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra 2024
योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
विभागआरोग्य मंत्रालय महाराष्ट्र सरकार
सुरुवातनाव बदलले आणि 1 एप्रिल 2017 रोजी पुन्हा सादर केले
उद्देशगरिबांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे
ऑफिशियल वेबसाइटhttps://www.jeevandayee.gov.in/

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Maharashtra

विमा हप्ता :
या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो. अशा प्रकारे आपल्याला विमा हप्ता मिळत असतो.

योजनेमध्ये समाविष्ट असलेले रूग्णालय :
या योजनेमध्ये 30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो. या योजनेमध्ये अशा प्रकारे रूग्णालये समाविष्ट आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना निःशुल्क औषधोपचार

सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत.

तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व 7/12 उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत.

वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर 10 दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत. \’Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Information in Marathi\’

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

0 thoughts on “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana in Marathi”

  1. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेत नाव नोंदणी करायची आहे.

Leave a comment