10 वी पास वर महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरू! येथून अर्ज करा | Maha Metro Recruitment 2023

By Marathi Corner

Updated on:

Maha Metro Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र मेट्रो रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे, ट्रेड नुसार नागपूर, मुंबई आणि पुणे शहरांमध्ये उमेदवारांची त्यांच्या पात्रतेनुसार निवड केली जाणार आहे.

भरतीमध्ये ITI पास उमेदवारांना देखील मोठी संधी असणार आहे, एकूण रिक्त जागा या 134 आहेत. भरती संबधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत ते या भरती साठी अर्ज करू शकतात.

भरती संबधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. सोबतच अधिक माहिती साठी तुम्ही अधिकृत जाहिरात देखील वाचू शकता, त्याची Direct Download Link आपण दिलेली आहे.

Maha Metro Recruitment 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटीस

🙋 Total जागा – एकूण 134 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण, आणि संबंधित विषयात ITI उत्तीर्ण

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – नागपूर, पुणे आणि नवी मुंबई

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 17 ते 24 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹150/- [राखीव वर्ग: ₹50/-]

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 28 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)Download PDF

Maha Metro Recruitment 2023 Apply Online

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे मध्ये अप्रेंटीस पदासाठी विविध जागांवर भरती सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही.

दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत उमेदवारांना त्यांचा फॉर्म ऑनलाइन स्वरूपात भरायचा आहे, त्यानंतर भरतीसाठी फॉर्म भरणे बंद होणार आहेत.

ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, कोणत्याही स्वरूपाची चूक न करता फॉर्म भरून घ्यायचा आहे.

भरतीसाठी जे कागदपत्रे आवश्यक आहेत, त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. फॉर्ममध्ये सर्व कागदपत्रे योग्य रित्या अपलोड करून घ्यायचे आहेत.

सोबतच परीक्षेसाठी फी भरणे देखील महत्त्वाचे आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

शेवटी संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर पुन्हा एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे. कोणतीही चूक आढळून आल्यास ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे.

चूक दुरुस्त केल्या नंतरच आणि फॉर्म रीचेक केल्यावरच अर्ज सबमिट करायचा आहे, त्या आगोदर फॉर्म सबमिट करायचा नाही, अन्यथा भरती साठी उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार नाही.

भरती संबंधी अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता, अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिरात वाचून नंतरच तुमचा फॉर्म भरा.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!