mahacovid19relief.in ऑनलाईन फॉर्म 50,000 हजार रुपये | maha covid19 relief Apply online registration application form

कोविड आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50000 हजार रुपयांचे सहाय्य मिळणार असून त्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ई-अर्ज दाखल करता येईल. यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर संबंधितांनी लॉगीन करून अर्ज भरावा. (Close relatives of people who have died of covid disease will get the assistance of Rs 50,000 for which an online apply registration application form 2021-22 can be submitted with minimum documents)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50000 हजार रुपये

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- (रु.पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधी मधून प्रदान करण्यास शासनाची मान्यता आहे.

दि. 30/06/2021 रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सहाय्य प्रदान करणेबाबत वर नमूद दिनांक 11 सप्टेंबर 2021 च्या परिपत्रकान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सविस्तर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 ऑक्टोंबर, 2021 रोजी सविस्तर आदेश निर्गमित केले आहेत.

राज्य शासनाने, महसूल व वन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची रक्कम लाथार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे.

त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करणेसाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाथार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची/ मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.

यास्तव, राज्यातील कोव्हिड-19 या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Relatives who died due to corona will get Rs 50,000)

Overview of the maha covid19 relief scheme

योजनेचे नावmaha covid19 relief योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन व केंद्र शासन
लाभार्थीकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना
उद्दिष्टनातेवाईकास रु. 50,000/- रु.पन्नास हजार
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटhttps://mahacovid19relief.in/login

Documents of maha covid19 relief yojana

 • Mandatory Documents (हे तीन लागतील)
 1. अर्जदाराची आधार कार्ड प्रत (aadhar card Copy)
 2. जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate)
 3. अर्जदाराचा आधार लिंक केलेला बँक खाते क्रमांक (Bank Passbook/ Cancelled cheque Copy)
 • Optional Documents (हे नसेल तरी चालतील)
 1. मृत व्यक्तीच्या आधार कार्डची प्रत
 2. अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेक प्रत
 3. मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र
 4. आरटी-पीसीआर अहवाल प्रत किंवा सीटी स्कॅन प्रत किंवा इतर कोणतेही वैद्यकीय दस्तऐवज (पीडीएफ/जेपीजी) दस्तऐवज क्रमांक 3 उपलब्ध नसताना

mahacovid19relief.in Apply Online Registration Application Form

 • Step 1 – या वेबसाईट वर जावे Apply Online https://mahacovid19relief.in/login
 • Step 2 – अर्जदाराचा स्वत:चा मोबाईल नंबर टाकून otp  घेऊन आपले लोगिन करावे. Online Registration Form
 • Step 3 – अर्जदाराचा स्वत:चा तपशील आणि आधार file अपलोड करावी व आपला आधार क्रमांक टाकावा
 • Step 4 – अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील भरावा
 • Step 5 – मृत पावलेल्या व्यक्तीचा तपशील भरावा
 • Step 6 – मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ खालील मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करावा.

खाली दिलेला संपूर्ण Video लाइव्ह पहा

Leave a Comment

close button