आता एका ग्राहकाला वर्षात एवढेच गॅस सिलेंडर मिळणार | lpg gas cylinder update

lpg gas cylinder update – आता वर्षभरात एका ग्राहकाला मिळणार केवळ 15 सिलिंडर घरगुती एलपीजी.

lpg gas cylinder update

ग्राहकांना आता नव्या नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादिबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

वर्षात एवढेच गॅस सिलेंडर

अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अ

नुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना त्या दराने वर्षभरात केवळ 15 सिलिडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलिडर घ्यावे लागेल. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला अतिरिक्त रीफिल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

close button