शासनाचा मोठा निर्णय, गॅस सिलेंडर वर 200 रु. माफ सबसिडी | LPG Gas Cylinder Subsidy Update 2022

LPG Gas Cylinder Subsidy Update 2022 – केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याबद्दल आणि गॅस सिलेंडरवर 200 रुपये अनुदान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

LPG Gas Cylinder Subsidy Update 2022

आपल्या ट्वीट्स मध्ये अमित शाह म्हणाले की, या आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून आणि गॅस सिलेंडरवर 200 रुपये अनुदान देऊन सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

अन्य क्षेत्रांसाठी देखील अशीच पावले उचलली आहेत, ज्यामुळे उत्पादनाच्या खर्चात कपात होईल.

शासनाचा मोठा निर्णय, गॅस सिलेंडर वर 200 माफ सबसिडी

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी म्हटले आहे की, मोदी जी देशातल्या प्रत्येक वर्गाची काळजी करणारे एक संवेदनशील नेता आहेत. त्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून देशातल्या गरीब, शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या हिताची चिंता नेहमीच मोदी सरकारच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी राहिली आहे.

या जन-हिताच्या निर्णयाबद्दल मी नरेंद्र मोदी जी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानतो.

SORCE – https://pib.gov.in/

Leave a Comment

close button