१८ व्या वर्षी मुलींना ७५ हजार रु. लेक लाडकी योजना महाराष्ट्र Lek Ladki Yojana Maharashtra 2023

By Shubham Pawar

Updated on:

Lek Ladki Yojana नमस्कार मित्रांनो 2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात जाहीर करण्यात आलेली आहे तर लेख लाडकी ही योजना नक्की काय आहे याचा कोण लाभ घेऊ शकतो या योजनेची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

Lek Ladki Yojana Maharashtra 2023

लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी ‘ योजना आता नव्या स्वरूपात महिलांसाठी अनेक नव्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत.

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबांतील मुलींना लाभ

  • जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
  • पहिलीत 4000 रुपये
  • सहावीत 6000 रुपये
  • अकरावीत 8000 रुपये
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

देवेंद्र फडणवीसांनी महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या?

  • महिलांना एसटीच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के सवलत
  • महिलांना मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत
  • बचत गटाच्या 37 लाख महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला
  • केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे मुंबईत युनिटी मॉलची स्थापना बचत गटासाठी
  • आशा स्वयंसेविकांचे सध्याचे मानधन 3500 आणि गटप्रवर्तकांच्या सध्याचे मानधन 4700 रुपये आहे. यामध्ये 1500 रुपयांची वाढ केली जाणार.
  • अंगणवाडी मदतनीसांचे मानधन 4425 वरुन 5500 करण्यात येत आहे.
  • शहरी भागात नोकरदार महिलांसाठी ५० नवीन वसतीगृहे उभारण्यात येतील
  • कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी शक्तीसदन योजना.
  • पीडित महिलांना आश्रय, समुपदेशन आणि कायदेशीर सेवा पुरवण्यात येणार.
  • राज्यातील अंगणवाडी सेविकांची 20 हजार रिक्त पदे भरणार 

This article has been written by Shubham Pawar from Pune Maharashtra. Shubham Pawar is a famous Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Developer and Owner/founder of Marathi Corner. 5 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment