संपूर्ण जमिनीचे नकाशे होणार ऑनलाईन | Land Digitization Maharashtra

Land Digitization : महसूल विभागामार्फत दिवसेंदिवस नागरिकांसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत; यामध्ये आता आणखी एका सुविधेची भर लवकरच पडणार आहे ती सुविधा म्हणजे जमिनीचा डिजिटल नकाशा.

Land Digitization Maharashtra

महसूल विभागाकडे असलेली जमिनीची सर्व कागदपत्रे कालांतराने जीर्ण होतात, त्यावरील अक्षरे अस्पष्ट दिसायला सुरू होतात, कागदपत्र नीट हाताळता येत नाही, तसेच अशी जुनी झालेली कागदपत्रे गहाळ होण्याची सुद्धा शक्यता असते.

📣 हे सुध्दा वाचा : मोबाईलवर पहा तुमच्या प्लॉट, घर, शेतीचा नकाशा !

वरील सर्व बाबींचा विचार करता शासनामार्फत आता सर्व प्रॉपर्टी कार्ड, सातबारा यांचे डिजिटल नकाशे लवकरच तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनामार्फत सुकाणू समितीसुद्धा 16 डिसेंबरला स्थापित करण्यात आलेली आहे.

उर्वरित 28 जिल्ह्यांचे नकाशे डिजिटल होणार

 महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या स्थितीत प्रॉपर्टी कार्ड व सातबारे डिजिटल स्वरूपात देण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याबरोबरच जमिनीचे नकाशेसुद्धा डिजिटल स्वरूपात देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2015 मध्ये घेण्यात आलेला होता.

घेण्यात आलेल्या निर्णयाला अनुसरून 6 जिल्ह्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प 2016 पासून राबविण्यात येत होता. आता उर्वरित 28 जिल्ह्यांमध्येसुद्धा हा प्रकल्प लवकरच राबवून डिजिटल स्वरूपातील नकाशे नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

जगाच्या जमिनीवर आपली जमीन दिसेल

डिजिटल नकाशा संपूर्ण अद्यावत तंत्रज्ञानावर बनवलेला असल्यामुळे या नकाशावर अक्षांश व रेखांशाची नोंद होणार आहे त्यामुळे जगाच्या नकाशावर सुद्धा आपली जमीन सहजासहजी आपल्याला अक्षांश व रेखांश च्या मदतीने पाहता येणार आहे.

📣 हे सुध्दा वाचा : शेळी, मेंढी खरेदीसाठी मिळवा 90% अनुदान

नकाशावर नेमकी जमीन कुठे आहे ? जमिनीच्या कायमस्वरूपी हद्दी कोणत्या आहेत ? इत्यादी माहिती सहज व सोप्या पद्धतीने नागरिकांना जगाच्या नकाशावरती डिजिटल नकाशे तयार झाल्यानंतर पाहता येईल. डिजिटल नकाशा बनविण्याची जबाबदारी बंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स या आयटी कंपनीकडे देण्यात आलेली आहे.

कागदी नकाशा व डिजिटल नकाशा थोडक्यात फरक

🌐 कागदी नकाशा

 • सतत वापर केल्यामुळे कागदी नकाशावरील माहिती नष्ट होण्याची शक्यता असते.
 • कागदी नकाशाची नक्कल घ्यावी लागते, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहावे लागते त्याचप्रमाणे नकाशासुद्धा तयार करावा लागतो.
 • नकाशाला अक्षांश व रेखांश नसतात.
 • नकाशावर दाखवलेल्या बिंदू नुसार मोजणी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया खूपच किचकट व अवघड आहे.
 • कागदी नकाशामध्ये पूर्ण पारदर्शकता नसते.
 • यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारे सहभाग घेता येत नाही.

🌐 डिजिटल नकाशा

 • डिजिटल नकाशा डिजिटल स्वरूपात सर्व्हरवर सेव्ह असल्यामुळे नष्ट होण्याची शक्यता नसते.
 • डिजिटल नकाशासाठी कोणत्याही प्रकारची नकल घेण्याची आवश्यकता नाही त्याचप्रमाणे लाभार्थी घर बसल्या डिजिटल नकाशा डाऊनलोड करू शकतात त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयात सुद्धा असण्याची आवश्यकता नाही.
 • डिजिटल नकाशाला अक्षांश व रेखांश असतात त्यामुळे आपली सगळी सहजरीत्या नकाशावर आपल्याला पाहता येते.
 • डिजिटल नकाशातील मॅपिंग डिजिटली केलेली असल्यामुळे मोजणी कमी वेळेमध्ये होते.
 • डिजिटल नकाशा संपूर्ण पारदर्शी असतो; कारण यामध्ये पूर्ववत नकाशा तयार केलेला असतो नवीन हाताने नकाशा तयार करायची आवश्यकता नसते.
 • डिजिटल नकाशा नागरिकसुद्धा सहजरीत्या डाऊनलोड करू शकतात.

निष्कर्ष : शासनाचा डिजिटल नकाशा संदर्भातील हा निर्णय जनसामान्य नागरिकांसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व उपयोगाचा आहे; कारण शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना डिजिटल नकाशासोबतच पारदर्शकता, जमिनीच्या तंतोतंत हद्दी, जमीन मोजणीसाठी कमीत कमी वेळ इत्यादी सुविधा मिळणार आहेत.

डिजिटल नकाशाचा फायदा?

डिजिटल नकाशा डिजिटल स्वरूपात सर्व्हरवर सेव्ह असल्यामुळे नष्ट होण्याची शक्यता नसते.

कागदी नकाशा असल्याने कोण कोणत्या समस्या येतात?

कागदपत्रे कालांतराने जीर्ण होतात, त्यावरील अक्षरे अस्पष्ट दिसायला सुरू होतात, कागदपत्र नीट हाताळता येत नाही, तसेच अशी जुनी झालेली कागदपत्रे गहाळ होण्याची सुद्धा शक्यता असते.

Leave a Comment

close button