कुसुम सोलर पंपाचे नवीन दर जाहीर | Kusum Solar Pump Yojana New Rates 2021

मुंबई: महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेले अर्जानुसार लाभार्थी हिस्सा प्राप्त आहे. परंतु, वित्त मंत्रालय, केंद्र शासन यांची सुचना नुसार दिनांक 30 सप्टेंबर, 2021 नुसार सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांसाठी वस्तु आणि सेवा कर (GST) दरामध्ये 5 टक्क्यांनी वाढ करणेत आली आहे. (Kusum Solar Pump Yojana New Rates 2021)

वित्त मंत्रालय, केंद्र शासन यांचे सुचनेची प्रत महाऊर्जाचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार लाभार्थी हिश्यामध्ये पुढीलप्रमाणे वाढ झाली असून आपणांस अतिरिक्त रुपये चा भरणा ऑनलाईन/ महाऊर्जा कार्यालयामध्ये जमा करणेत यावा. शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा याबाबत माहिती पुढीलप्रमाणे आहे.

पुढील माहिती याप्रमाणे दिलेली आहे:

प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)

3 एच.पी.

  • खुला – 15650 – 1393- 17043 – 2160 – 17810 – 767
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 7823 – 696 – 8522 – 1080 – 8905 – 383

5 एच पी

  • खुला – 22250 – 1980 – 24230 -3071 – 25321 – 1091
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 11125 – 990 – 12115 – 1535 – 12660 – 545

7.5 एच.पी. 

  • खुला – 34350 -3057 – 37407 – 4740 – 39090 – 1683
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 17174 – 1529 – 18703 – 2370 – 19545 – 842

अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले.

Leave a Comment