महाराष्ट्र कृषी सेवक भरती 2023 | Krushi Sevak Bharti 2023

By Marathi Corner

Updated on:

Krushi Sevak Bharti 2023: मित्रांनो महाराष्ट्र शासनाने कृषी विभगात कृषी सेवक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे. या संबंधीची जाहिरात शासनाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, कृषी सेवक भरती 2023 साठी फॉर्म कसा भरायचा? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? पात्रता निकष, शेवटची तारीख, Official Website अशी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Krushi Sevak Bharti 2023 विषयी सविस्तर माहिती

भरतीचे नावkrushi Sevak Bharti 2023
पदाचे नावकृषी सेवक (Krushi Sevak)
पदसंख्या एकूण2109 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा19 ते 38 वर्षे
पात्रता निकषपदवी किंवा पदवी समतुल्य
परिक्षा फीखुला वर्ग – ₹1000 राखीव वर्ग – ₹900
अर्जाची शेवटची तारीखअपडेट होईल

 

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अभ्यासक्रमClick here
जाहिरात PDFDownload
ऑनलाईन अर्जApply Online
कृषी सेवक भरती पात्रता निकष

कृषी सेवक भरतीसाठी (Krushi Sevak Bharti) शासनाने पात्रता निकष जाहीर केले आहेत, या पात्रता आणि निकषांच्या आधारा वरच कृषी सेवक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पात्रता निकषांमध्ये वयोमर्यादा निकष आणि शैक्षणिक पात्रता निकष समाविष्ट आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या अशा पात्रता आणि कशाची सविस्तर अशी माहिती आपण खालील प्रमाणे घेऊया.

कृषी सेवक भरती शैक्षणिक पात्रता निकष

कृषी सेवक भरती 2023 साठी शासनाने शैक्षणिक पात्रता निकष ठरवले आहे, या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावरच कृषी विभागात कृषी सेवक पदासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे आणि पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज देखील करता येणार आहे.

कृषी सेवक पदासाठी उमेदवार हा शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतलेला असावा. आणि त्याच्याकडे पदवी चे शिक्षण असावे, किंवा पदवी समतुल्य शिक्षण त्यांनी पूर्ण केलेल्या असावे.

कृषी सेवक भरती वयाची अट (वयोमर्यादा निकष)

पात्रता आणि निकषांमध्ये दुसरे महत्त्वाचे निकष म्हणजे वयोमर्यादा निकष, उमेदवाराला कृषी सेवक भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

कृषी सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 वर्षाचा असावा. वयोमर्यादा ही 19 ते 38 वर्षे दरम्यान आहे, मागासवर्गीय राखीव प्रवर्गासाठी कशामध्ये शिथीलता देण्यात आली आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा ही 19 ते 43 वर्षे इतकी असणार आहे, म्हणजेच राखीव गटातील उमेदवारांना कृषी सेवक भरतीसाठी 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. Krushi Sevak Bharti

कृषी सेवक भरती जाहिरात PDF

शासनाने कृषी सेवक भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जाहिरात PDF प्रसिद्ध केली आहे. कृषी सेवक भरती जाहिराती मध्ये भरती प्रक्रिये संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे. जर तुम्हाला कृषी सेवक पदासाठी प्रत्येक प्रक्रिया सहभागी व्हायचे असेल, तर तुम्हाला ही जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. PDF Download करण्यासाठी Official Direct Link वर सुरुवातीला देण्यात आली आहे. Download वर क्लिक करून तुम्ही ती जाहिरात PDF Download करून घेऊ शकता किंवा ती पाहू शकता.

कृषी सेवक भरती अभ्यासक्रम

कृषी सेवक भरती सुरू होणार आहे त्यासाठी शासनाने अभ्यासक्रम देखील सांगितला आहे. कृषी सेवक भरती परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या अभ्यासक्रम Design करण्यात आला आहे. जर तुम्ही या कृषी सेवक पदासाठी तयारी करत असाल तर कृषी सेवक भरती 2023 चा अभ्यासक्रम दिला आहे. त्याची PDF आहे, ती तुम्ही पाहू शकता किंवा Download पण करू शकता. जाहिरात PDF च्या Direct Link आगोदर अभ्यासक्रम साठीची PDF Download करण्याची Link देण्यात आली आहे.

कृषी सेवक भरती 2023 ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा?

कृषी सेवक भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांना खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून ऑनलाईन फॉर्म भरता येईल.

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या, वेबसाईट ची Direct Link आम्ही वर दिली आहे.
  2. वेबसाईट वर आल्यावर तुम्हाला Krushi Sevak Bharti 2023 किंवा Apply online हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
  3. तुमच्या समोर भरती साठीचा फॉर्म उघडेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
  4. आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, त्यानंतर परीक्षा फी भरायचे आहे.
  5. संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचा आहे, चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे.
  6. सर्व अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून अर्ज Submit करायचा आहे.

Leave a Comment