Kranti Din Speech in Marathi – सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो….
आज 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपण सर्वजन एकत्र जमलो आहोत. प्रथम सर्वांना माझा नमस्कार !
Kranti Din Speech in Marathi
भारतभूमी स्वतंत्र्य करण्या
तळहाती घेऊनी प्राण….
बलिदानाचे कफन बांधुनी,
लढले क्रांती वीर महान…!
इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन ! “Kranti Din Speech in Marathi”
स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला हाकलून लावण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. या लगात गोंदिया जिल्ह्यातील काही लोकांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व क्रांतीवीराना माझे नमन….
क्रांती दिन भाषण मराठी मध्ये
सन 1942 चा अखेरचा लढा देण्याचे महात्मा गांधीजींनी ठरविले. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला, आणि ‘लढेंगे या मरेंगे’ ची घोषणा केली. सारा देश पेटून उठला. ‘Kranti Din Speech in Marathi’
त्याच रात्री गांधीजीसह अनेक नेत्यांना अटक झाली. लाखो तरुणांनी यात सहभाग घेतला. सारा देशच तुरुंग बनला. 1 अनेक कार्यकर्ते भूमिगतही झाले. पण दुसऱ्या दिवशी सर्व भारतभर जनआंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलकांनी प्रचंड आंदोलने केली.
अधिवेशनात गांधीजींनी दिलेला ‘चले जाव’ चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला आंदोलकांवर ब्रिटिश सरकारने लाठी हल्ले व गोळीबार ही केले परंतु आंदोलकांनी त्याला न जुमानता प्रचंड हिंसक आंदोलने केली.
Kranti Din Speech in Marathi
स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलना मुळेच उगवली हे विसरता येणार नाही. अरुणा असफअली यांनी गवालिया टँकवर तिरंगा फडकवला. तसेच अनेक ठिकाणी ‘लोकाभिमुख सरकार स्थापन झाली. यालाच ‘प्रतिसरकार’ म्हणतात. (Kranti Din Speech in Marathi)
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारने विशेष कामगिरी केली. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. अशा आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम..।
आधुनिक भारताच्या इतिहास ऑगस्ट क्रांती दिनास विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट क्रांती ही वसाहतवादविरोधी, वर्णवादविरोधी आणि भांडवलशाहीविरोधी क्रांती होती.
भारतीय राष्ट्रवादास अद्भुत चेतना आणि प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आपणास ऑगस्ट क्रांतीमध्ये दिसून येते. ज्या दिवशी आपल्या हाती कोणतीही शस्त्रे नसताना महात्मा गांधी यांनी चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा केल्या आणि सबंध भारतातून इंग्रजांविरोधात असंतोषाची लाट निर्माण झाली.
ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नव्हता, अशा इंग्रजी सत्तेला भारतीय जनआंदोलनातून जे जबरदस्त आव्हान देण्यात आले, त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
क्रांती दिन भाषण मराठी मध्ये
14 जुलै 1942 रोजी बापू कुटीत भारत छोडो चळवळीचा ठराव झाला. या ठरावास ‘वर्धा योजना’ म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी यांना या चळवळीचे सर्वाधिकार दिले होते. मुंबई येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ‘चले जाव’ चळवळीचा ठराव मंजूर झाला. त्यानुसार 8 ऑगस्ट 1942 रोजी आझाद मैदानावर गांधीजींनी भाषण केले आणि त्यात ‘डू ऑर डाय’ हा महत्त्वाचा नारा दिला.
‘यंग इंडिया’ या साप्ताहिकातील लेखात गांधीजी म्हणतात, ‘हा मोठा कसोटीचा क्षण आहे. ही अग्निपरीक्षा आहे. जनतेने चले जाव चळवळीचे भरभरून समर्थन करावे. आमचे अंधभक्त बनू नका. आमचे काही चुकत असेल तर आमच्यावर तुम्ही टीकाही करू शकता. पाशवी साम्राज्यसत्ता असलेल्या इंग्रजी सत्तेला मुळापासून हादरवून टाकणारा हा ठराव होता आणि त्याला गांधीजींचे नेतृत्व होते. या ठरावावर काँग्रेस महासभेत चर्चा झाली होती.
Kranti Din Speech in Marathi
चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी विरोध करत वेगळी भूमिका घेतली होती. स्वतः गांधीजींनी मुंबईतील व भूमिका घेतली ती स्वतः सोहीबीच त्यांना इंग्रजांनी अटक केली. काँग्रेसचे सर्व नेते भूमिगत झाले. अशा वेळी तडफदार युवा नेत्या अरुणा असफअली यांनी गवालिया टँक म्हणजेच आझाद मैदानावर तिरंगा फडकवला आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन चळवळीस प्रारंभ झाला. संपूर्ण हिंदूस्थानात या चळवळीचे पडसाद उमटले.
9 लाख लोकांना अटक झाली आणि हे जनआंदोलन मोठ्या प्रमाणात सफल झाले. अनेक ठिकाणी लोकांनी सरकारी कार्यालयांवर, टेलिफोनच्या तारांवर हल्ले केले आणि मालमत्तेचे नुकसान केले. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने पुढे गांधीजींना इंग्रजांनी मुक्त केले; परंतु प्रमुख नेत्यांना चार-पाच वर्षे कारावास भोगावा लागला; पण इंग्रजांच्या सत्तेला जबरदस्त हादरा बसला होता.
इंग्रजांनी लढ्याच्या पहिल्याच दिवशी ज्येष्ठ नेत्यांची धरपकड केल्याने दुसऱ्या दिवशी अरुणा असफअली यांनी या चळवळीचे नेतृत्व केले. या चळवळीत लोकनायक जयप्रकाश नारायण, पंडित नेहरू, असीफ मेहता इत्यादी प्रमुख नेत्यांचे महत्त्व होते, चले जाव चळवळीचे मूल्यमापन करताना दयानंद विद्यापीठातील इतिहासाचे अभ्यासक डॉ. मलिक म्हणतात की, चले जाव चळवळीने अभूतपूर्व क्रांती केली. Kranti Din Speech in Marathi
इंग्रजांना आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे याची खात्री पटली आणि भारताच्या स्वातंत्र्यास पोषक वातावरण तयार झाले. या चळवळीस तत्काळ फलश्रुती मिळाली नसली तरीही नंतर मिळालेल्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला.
क्रांती दिन भाषण मराठी मध्ये
1942 च्या लढ्यानंतर पुढे त्रिमंत्री योजना आली आणि लॉर्ड अॅटली यांनी भारताच्या स्वातंत्र्यास अनुकूलता दर्शवली. म्हणजे 1942 चा लढा हा भारतीय स्वातंत्र्याची दर्शला समीप अरवालाच्या मानेले एक धाडसी पाऊल होते. या लोकलढ्याने भारतीय तरुणांमध्ये इंग्रजांविरोधात जबरदस्त जागृतीची वाट निर्माण केली.
एस. एम. जोशी, अशोक मेहता, जयप्रकाश नारायण वर्णन यांसारख्या नेत्यांचा उदय याच काळात झाला. पुढील ५० वर्षांच्या राजकारणावर आपल्या कार्यकर्तृत्वाने, विचाराने या नेत्यांनी ठसा उमटवला. तरुणांचे नवे नेतृत्व प्रदान करणारी चळवळ आणि नव्या युगाला सामोरे जाण्यासाठी जनतेमध्ये विश्वास निर्माण करणारी चळवळ, असे या
जगाच्या इतिहासावर विलक्षण ठसा उमटवणाऱ्या बोल्शेविक क्रांती तसेच अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती या क्रांतिकारक घटनांप्रमाणेच ऑगस्ट क्रांतीलाही विशेष महत्त्व आहे. वसाहतवादी सत्तेला या क्रांतीने हादरे दिले, चले जाव चळवळीने इंग्रजांच्या शोषक प्रवृत्तीविरुद्ध जागतिक पातळीवर जागृती घडवून आणली. Kranti Din Speech in Marathi
Kranti Din Speech in Marathi
हिंदुस्थानसारख्या विशाल, खंडप्राय, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशावर राज्य करणे यापुढे कठीण आहे. हिंदुस्थानातील जनता आता जागृत झाली आहे, ती कुठल्याही क्षणी इंग्रजी सत्तेला सुरुंग लावू शकते हे लक्षात घेऊन आपण हिंदुस्थानातून काढता पाय घेतला पाहिजे आणि हिंदुस्थानातील जनतेवर स्वातंत्र्य देऊन जबाबदारी टाकली पाहिजे, स्वतःच्या देशाचा कारभार चालवण्यासाठी ते समर्थ आहेत, अशी खात्री इंग्रजांना पटली.
म्हणजे महात्मा गांधी यांनी वर्धा येथे ठराव करून बापू कुटीमध्ये घेतलेला चले जाव चळवळीचा क्रांतिकारक ठराव अशा प्रकारे मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर सफल झाला. त्यामुळे या मैदानाचे नाव पुढे आझाद क्रांती मैदान किंवा ऑगस्ट क्रांती मैदान असे अवला. मैदान किवा आरती या इति होवाने असे 9 तेजस्वी सुवर्णलिब पाहिले आणि या सूर्याने स्वातंत्र्याचा मंगलक्षण समीप आणला, असेच आपणास या लढ्याचे वर्णन करता येइल. Kranti Din Speech in Marathi
आधुनिक भारताच्या विकासासाठी भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद इत्यादीपासून आपण मुक्त होण्याची गरज आहे. इंग्रजांना तर आपण हाकलून दिले; पण आता आपल्या व्यवस्थेत असलेले दोष आपण दर केले पाहिजेत; जेणेकरून शोषणमुक्त कृषी औद्योगिक समाज आपण निर्माण करू शकतो. स्वातंत्र्याचे स्वराज्य, सुराज्य आणि रामराज्यात रूपांतर करू शकणे हीच ऑगस्ट क्रांतीमध्ये बलिदान केलेल्या हुतात्म्यांसाठी खरी आदरांजली ठरेल.
क्रांती दिन कधी साजरा केला जातो?
क्रांती दिन 9 ऑगस्ट ला साजरा केला जातो.
गांधीजींनी ब्रिटिश सरकारला कोणता इशारा दिला?
गांधीजींनी ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला.