Kharip Hangam 2022 Antim Paisewari: मित्रांनो, खरीप हंगाम 2021-22 च्या खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीकडे (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले असताना, अखेर जिल्हानिहाय 2021-22 खरीप पिकांची अंतिम पैसेवारी (Kharip Antim Paisewari) जाहीर करण्यात आली असून, कोणत्या जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी {Kharip Hangam 2022 Antim Paisewari} किती जाहीर करण्यात आली आहे, हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.
Kharip Hangam 2022 Antim Paisewari
मित्रांनो, साधारणत: १५ नोव्हेंबर नंतर मुग व उडीद, ३१ जानेवारी पर्यंत सोयाबीन व इतर खरीप पिके, २८ फेब्रुवारी पर्यंत कापूस आणि ३१ मार्च पर्यंत तूर व कांदा या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत असते. त्यानंतर सरासरी उत्पादनाची आकडेवारी पाहून नुकसान भरपाई अदा करण्या बाबत निर्णय घेण्यात येत असतो. तर आता तहसिलदार यांनी तालुकानिहाय खरीप पिकांची अंतिम पैसेवारी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) काढून जिल्हाधिकारी यांना पाठवली जाते आणि नंतर जिल्हाधिकारी सर्व तालुकानिहाय Kharip Hangam 2022 Antim Paisewari जाहीर करत असतात.
या दोन जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली, यादी डाऊनलोड करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
या जिल्हयांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर
१) वाशिम
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची वाशिम जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. यातील सर्वच ७९३ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.
- वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे.
- मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
- रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी ४६ पैसे आहे.
- मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
- कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
- मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) सरासरी ४७ पैसे इतकी आढळून आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
२) अकोला
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अकोला जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
- तालुकानिहाय हंगामी पैसेवारी पुढीलप्रमाणे :
- अकोला ४५ पैसे, अकोट ४८ पैसे, तेल्हारा ४७ पैसे, बाळापूर ५१ पैसे, पातूर ५१ पैसे, मुर्तिजापूर ४६ पैसे तर बार्शीटाकळी ५० पैसे असे सरासरी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) ४८ पैसे निश्चित करण्यात आली आहे.
३) यवतमाळ
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची यवतमाळ जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
- तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी
- यवतमाळ ४८ पैसे, कळंब ४६ पैसे, बाभूळगाव ४६ पैसे, आर्णी ४५ पैसे, दारव्हा ४७ पैसे, दिग्रस ४७ पैसे, नेर ४६ पैसे, पुसद ४७ पैसे, उमरखेड ४७ पैसे, महागाव ४६ पैसे, केळापूर ४७ पैसे, घाटंजी ४७ पैसे, राळेगाव ४७ पैसे, वणी ४५ पैसे, मारेगाव ४६ पैसे, झरी ४८ पैसे.
असे सरासरी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) ४७ पैसे निश्चित करण्यात आली आहे.
४) नांदेड
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची नांदेड जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहिर करण्यात आली आहे.
- तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे (कंसात गावांची संख्या)
- नांदेड ४७ पैसे (८८), अर्धापूर ४८ पैसे (६४), कंधार ४७ पैसे (१२६), लोहा ४४ पैसे (१२७), भोकर ४९ पैसे (७७), मुदखेड ४९ पैसे (५५), हदगाव ४९ पैसे (१३७), हिमायतनगर ४७ पैसे (६४), किनवट ४७ पैसे (१९१), माहूर ४७ पैसे (९२), देगलूर ४८ पैसे (१०८), मुखेड ४९ पैसे (१३५), बिलोली ४७ पैसे (९१), नायगाव ४८ पैसे (८९), धर्माबाद ४८ पैसे (५६), उमरी ४९ पैसे (६२)
असे सरासरी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) ४८ पैसे निश्चित करण्यात आली आहे.
५) परभणी
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची परभणी जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७.६० पैसे इतकी जाहिर करण्यात आली आहे.
- परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची अंतिम हंगामी पैसेवारी (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) सरासरी ४७.६० पैसे आली आहे.
- परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) संपूर्ण कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द (ता. जिंतूर), लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणांसाठी संपादित झाली. त्यामुळे ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.
तारबंदी योजनेची संपूर्ण माहिती
👇👇👇
इतर जिल्हयांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी लवकरच
तर मित्रांनो, अशाप्रकारे वरील जिल्ह्यांच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर (Kharip Hangam 2022 Antim Paisewari) करण्यात आल्या आहेत. इतर जिल्हयांचे अपडेट सुद्धा लवकरच येईल. तुमच्या जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाणून घेण्याकरिता तुम्ही आमच्या www.marathicorner.com या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.