Karj Mafi yojana 2022 Maharashtra राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्ज माफी (loan waiver) मिळणार आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्ज माफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्ज माफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Karj Mafi yojana 2022 Maharashtra
ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार हे सविस्तर जाणून घेऊयात. ( Maharashtra Farmer loan waiver of Rs 348 crore to farmers)
भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. भूविकास बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली.
कर्ज माफी महत्वाची माहिती
योजनेचे नाव | Karj Mafi yojana 2022 Maharashtra |
लेख | यादी 2022 |
कर्ज माफी यादी | 2022 |
संबंधित प्राधिकरण | महाराष्ट्र सरकार |
राज्य | महाराष्ट्र |
मध्ये लाँच केले | August 2022 |
योजनेचा प्रकार | भूविकास बँक कर्ज योजना |
लाभार्थी | शेतकरी |
कमाल मर्यादा रक्कम | 348 कोटी रुपयांची कर्ज माफी |
भूविकास बँक कर्ज योजना
1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली. कर्जवाटप थांबल्यानं ‘नाबार्ड’ने अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या.
अखेर 86 वर्षं सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. पण भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत.
निसर्गाच्या लहरी कारभारामुळं आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेले. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतक-यांसाठी मोठा दिलासा दिलाय.