शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी ताबडतोब करा हे काम | कर्जमाफी साठी शेवटची संधी

karj mafi news maharashtra

मुंबई: ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कर्ज काढले असेल त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी. कर्जमाफीसाठी ही शेवटची संधी, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा कर्जबाजारीपणाचा शिक्का कायम राहणार..! तुम्हाला कर्जमाफी साठी काय करावे लागेल याची संपूर्ण माहिती लेखामध्ये सांगितलेली आहे. (farmers should do this work early for debt waiver)

 

Karj Mafi News Maharashtra 2021

 • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीचा योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर आधार प्रमाणीकरण हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. असे असतानाही अनेक पात्र झालेले शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
 • 15 नोव्हेंबर आधार प्रमाणीकरण करण्याची अंतिम मुदत असताना एकट्या नांदेड जिल्ह्यात 5 हजार 752 शेतकऱ्यांनी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. शिवाय आधार प्रमाणीकरण केले नाही तर या खातेदारांची कर्जमाफी ही होणार नाही.
 • याबाबत अनेक वेळा अवाहन करण्यात आले असताना देखील शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी केवळ 10 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना या आठवड्यातील शासकिय सुट्ट्या आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया याचा विचार करता लागलीच ही प्रकिया पूर्ण करणे गरजेचे झाले आहे.
 • नांदेड जिल्हा हा ‘ई-पीक पाहणी’ आणि पीक नुकसानीच्या भरपाईत राज्यात अव्वल राहिलेला आहे. येथील प्रशासनाने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत असताना हा जिल्हा आता आधार प्रमाणीकरणासाठी पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. (karj mafi news maharashtra)
हे देखील वाचा »  पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावं लागणार नवीन नियम लागू | New rules apply to helmets

 

कर्जखात्यांच्या याद्या बँकाकडे प्राप्त

 • नांदेड जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 94 हजार एक अशा पात्र खातेदारांच्या याद्या ह्या विशिष्ट क्रमांकासह प्रदान करण्यात
 • आलेल्या आहेत. त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांचीही कर्जमाफीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. याकरिता आवश्यकता आहे ती आधार प्रमाणीकरणाची.
 • 15 नोव्हेंबर ही अंतिम मुदत ठरवून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 88 लाख 249 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण हे केलेले आहे. मात्र, उर्वरीत शेतकऱ्यांनीही वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे अवाहन सहकारी संस्थेचे उपनिबंधक यांनी केले आहे.
हे देखील वाचा »  आता सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर येणार | 712 utara mobile number update

काय आहे आधार प्रमाणीकरण?

 • कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे.
 • अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे.
 • आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्ये बदल करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे.
 • यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात. प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
 • या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बँकेमध्येही हे बदल करुन घेता येते.
हे देखील वाचा »  कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते? हे नियम माहिती आहेत का?

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top