शेतकऱ्यांनो कर्जमाफी च्या लाभासाठी शेवटची संधी | करा ताबडतोब हे काम

karj mafi maharashtra

Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana (mjpsky): मा. उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापने नंतर २१ डिसेंबर २०१९ रोजी महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना २०२१ सुरू करण्यात आली. अंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पिकासाठी कर्ज घेतले आहे ,ते कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार आहे.

या महात्मा जोतिबा फुले कर्ज माफी योजना चा लाभ गरीब शेतकऱ्यांना तर होणारच आहे. तसेच याचा फायदा उस ,फळे आणि इतर पारंपारिक शेती करणार्‍या राज्यातील अनेक शेतकऱ्यांना देखील होणार आहे.

महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांना कर्ज माफ करण्याची कोणतीही अट राहणार नाही आणि त्याचा संपूर्ण तपशील काही दिवसात मुख्यमंत्री कार्यालय मार्फत जाहीर करण्यात

हे देखील वाचा »  आता मतदान कार्ड नोंदणीबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार व्हॉट्सॲप द्वारे एका क्लिकवर | mahavoter.in झाले लॉन्च

या लेखामध्ये आपणांस शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असेल तर एक काम करायचे सांगितलेले आहे. ते काम या लेखामध्ये सांगितले आहे. ही माहिती जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा.

 

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना

  • दिनांक २७.१२.२०१९ नुसार दिनांक ०१.०४.२०१५ ते ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही योजना सुरु करण्यात आलेली असुन मा. प्रधान सचिव यांनी दिनांक १४.१०.२०२१ रोजी या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला आहे.
  • जिल्हयात या योजने अंतर्गत आज अखेर एकुण १,७१,६२५ इतक्या पात्र कर्जखात्यांच्या यादया विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेल्या असुन त्यापैकी एकुण १,६७,६२९ खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केलेले असुन ३९९५ खातेदारांचे आधार प्रमाणीकरण होणे बाकी आहे. Karj Mafi Yojana Latest News in Marathi
हे देखील वाचा »  मोठी घोषणा !! एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 7200 रूपयांपर्यंत वाढ – मंत्री ॲड.अनिल परब

 

Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana

या योजनेचे अंमलबजावणीचे कामकाज नजिकच्या काळात अंतिम टप्यात नेणे आवश्यक आहे. योजनेतील ३९९५ पात्र कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त असतानाही संबधित लाभार्थ्यांनी अदयाप आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याने त्यांना कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही.

त्या अनुषंगाने योजना अंमलबजावणी मधील आधार प्रमाणी करण व तक्रार निराकरण या टप्यावरील प्रलंबित कामकाज विशेष मोहिमेव्दारे पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. ‘Karj Mafi List 2021 Maharashtra’

 

कर्जमाफी हवी असेल तर ताबडतोब करा हे काम

दिनांक १५.१०.२०२१ ते १५.११.२०२१ या कालावधीत प्रलंबित आधार प्रमाणीकरण तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत असुन आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँक शाखा, संस्था कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा »  आता सातबारा उताऱ्यावर मोबाईल नंबर येणार | 712 utara mobile number update

या विशेष मोहिमे अंतर्गत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असुन आधार प्रमाणीकरण करण्यासाठी ही अंतिम संधी आहे. या कालावधीत आधार प्रमाणीकरण न केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळु शकणार नाही.

यासाठी सर्व संबधित लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणा सोबतच तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय तक्रारींच्या निराकरणासाठी तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालय व बँक शाखेशी संपर्क साधावा. Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana

 

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top