कांदाचाळ अनुदान योजना 2022 | Kanda Chal Anudan Yojana

Kanda Chal Anudan Yojana

Kanda Chal Anudan Yojana Maharashtra 2022  महाराष्ट्रात कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते.

कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुस-या क्रमांकावर असून देशांतर्गत गरजा भागवून भारतातून कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे.

शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करुन देण्यासाठी सदर योजना राबविली जाते.

मित्रांनो ‘Kanda Chal Anudan Yojana’ च्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, लाभाचे स्वरूप, संपर्क कुठे साधावा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

कांदाचाळ अनुदान योजना प्रमुख अटी

 1. कादाचाळीचे बांधकाम विहीत आराखड्याप्रमाणे असणे बंधनकारक.
 2. 5,10,15,20,25 व 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळींना अनुदानाचा लाभ.
 3. कांदा पिकाखालील क्षेत्राची 7/12 उताऱ्यावर नोंद असणे आवश्यक.
 4. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यात प्रस्ताव संबंधित
  सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांचेकडे दाखल करावा.
 5. वैयक्तिक शेतकऱ्यास 100 मे.टन तर सहकारी संस्थांसाठी 500 मे.टन चाळी बांधण्याची तरतुद.

Kanda Chal Anudan Yojana Documents

कांदाचाळ अनुदान योजना
कांदाचाळ अनुदान योजना

(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी:

 • विहीत नमुन्यातील अर्ज
 • अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी.
 • 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे.
 • तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा.
 • वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे.
 • कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल.
 • लाभार्थीनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा.
 • अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा.
 • कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा.
 • अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. Kanda Chal Anudan Yojana
 • सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल.
हे देखील वाचा »  ZP Yojana Jalna जिल्हा परिषद योजना जालना

50 टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक

अ.क्र. तपशील परिमाण दर युनिट रक्कम
1. पाया खोदाईचे काम 10.2 ढोबळ मानाने ढोबळ मानाने 1700.00
2. पायामधील प्लेन सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 4 : 8 2.55 1377.50 घन मी. 3512.63
3. खांबासाठी पाया सळईसहचे सिमेंट कॉंक्रिट प्रमाण – 1 : 2: 4 6.21 2202.50 घन मी. 13666.51
4. सिमेंट कॉंक्रिट खांबासाठी लोखंडी बार / शिगा 289.41 39.40 कि.ग्रॅ. 11402.75
5. स्ट्रक्चरल स्टील (अँगल इ.) 3314.78 42.20 कि.ग्रॅ. 139883.72
6. खांबासाठी 2 इंच व्यासाचे लोखंडी पाईप 104.40 175.00 मीटर 18270.00
7. ॲजबस्टॉस सिमेंटचे पत्र्याचे छप्पर 160.00 231.25 चौ.फुट 37000.00
8. ॲजबेस्टॉस सिमेंटती पन्हाळी (रीज) 25.00 192.50 मीटर 4812.50
9. 2 इंच व्यासाचे अर्धगोल बांबु, 3 इंच अंतरावर (तळ व भिंती करीता) 2798.40 10.50 मीटर 29383.20
एकूण 259631.31
5 टक्के अकस्मित खर्च 12981.57
एकुण 272612.88
4 टक्के व्हॅट 10904.51
33 टक्के अंदाजित किंमतीवर 12.24 टक्के सर्व्हिस टॅक्स 11011.38
एकुण एकंदर 294528.77
(अक्षरी रुपये दोन लाख चौऱ्यानव हजार पाचशे एकोमतीस मात्र) Kanda Chal Anudan Yojana 

कांदाचाळ अनुदान योजना

(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत:
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.

 • कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
 • संस्थे मार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी.
 • संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे.
 • प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा.
 • साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.
हे देखील वाचा »  अब्दुल कलाम टेक्नॉलॉजी इनोव्हेशन नॅशनल फेलोशिप | Abdul Kalam Technology Innovation National Fellowship

लाभाचे स्वरूप:-

वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी 1 लाख 50 हजार अनुदान दिले जाते. तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या / कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी 7 लाख 50 हजार एवढे अनुदान दिले जाते.

या ठिकाणी संपर्क साधावा :-

पणन मंडळाचे मुख्यालय/विभागिय कार्यालय /जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषि उत्पन्न बाजार समित्या.

हे देखील वाचा »  How to Order Liquor/Alcohol Online Delivery in Maharashtra District @www.mahaexcise.com Check how to register online

 

कांदाचाळ साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा विडियो बघा 👇👇

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top