राष्ट्रगीत जन गण मन | Jan Gan Man in Marathi

Jan Gan Man in Marathi

Jan Gan Man in Marathi If you looking for a जन गण मन पूर्ण गीत then this is the right place for you here we are providing Jan Gan Man in Marathi lyrics.

जन गण मन हे आपल्या भारताचे राष्ट्रगीत आहे. हे गीत कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचलेले आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेला 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे.

राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला 52 सेकंद वेळ लागतो. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात सर्वप्रथम हे सार्वजनिकपणे हे गीत गायले गेले आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे (Jan Gan Man in Marathi)

जन गण मन पूर्ण गीत | jan gan man in marathi lyrics

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग

विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
प्रेमहार हय गाथा
जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||
पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री

तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री

दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे

संकंट दुखयात्रा

जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
स्नेहमयी तुमी माता
जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||
रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले

गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले

तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ | jan gan man meaning in marathi

शब्द – जन-गण-मन (Jan Gan Man in Marathi) अधिनायक जय है भारत भाग्य विधाता

येथे क्लिक करा »  सीईटी परीक्षेबाबत महत्वाची घोषणा ! | Important announcement CET Exam Time Table 2021

अर्थ – तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!

शब्द – पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।

अर्थ – पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.

शब्द – विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग।

येथे क्लिक करा »  शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रू. नुकसान भरपाई मिळणार, अतिवृष्टी भरपाई जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

अर्थ – विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

शब्द – तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।

अर्थ – हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.

येथे क्लिक करा »  KYC-VS कोविनचे नवीन फिचर | केवायसी-व्हीएस म्हणजे काय? लसीकरणाची स्थिती तपासण्यासाठी कॉविनवरील नवीन अपडेट

शब्द – जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।

अर्थ – तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.

भारताचे राष्ट्रगीत कोणी रजचले आहे?

भारताचे राष्ट्रगीत हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेले आहे.

राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला किती वेळ लागतो?

राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला 52 सेकंद वेळ लागतो.

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top