कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

मुबई: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई दिलासा निधीत वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; नवा भत्ता 01.07.2021 पासून लागू (Increase in funding for employee dearness allowance)

मूळ वेतन/निवृत्तीवेतन यांच्यावरील सध्याच्या 28% दराव्यतिरिक्त 3% वाढ होणार

या निर्णयाचा लाभ देशातील सुमारे 47 लाख 14 हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार निवृत्तीवेतनधारकांना होणार

या निर्णयामुळे महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी 9,488.70 कोटी रुपयांचा बोजा पडणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तर निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई दिलासा निधीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली.

या निर्णयानुसार वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मुलभूत वेतन/निवृत्तीवेतन यांच्यावर सध्या 28% दराने दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्याव्यतिरिक्त हा अधिकचा 3% भत्ता असेल आणि तो 1 जुलै 2021 पासून देय असेल.

सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित स्वीकृत सूत्रांनुसार ही वाढ देण्यात आली आहे. महागाई भत्ता आणि दिलासा निधीपोटी देशाच्या तिजोरीवर दर वर्षी 9,488.70 कोटी रुपयांचा बोजा पडणार असून सुमारे 47 लाख 14 हजार केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68 लाख 62 हजार निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

 

Leave a Comment

close button