मोठी घोषणा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने केली

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. उसाच्या FRP रकमेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर उसावरील रास्त आणि लाभदायक किंमत (FRP) 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज कॅबिनेटच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या उसाला देण्यात येणाऱ्या FRP संदर्भात चर्चा झाली. FRP वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. FRP वाढवून प्रति क्विंटल 290 रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. हे 10 टक्के रिकवरीवर आधारीत आहे, असं पीयूष गोयल यांनी म्हटलंय.

सरकारच्या आजच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाच्या वर 87 टक्के रिटर्न भेटेल. उसाला चांगला FRP देऊन आम्ही हे सांगू इच्छितो की आमच्या उस उत्पादक शेतकऱ्याला इतर सर्व पिकांपेक्षा जास्त भाव मिळावा, असंही पियूष गोयल यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, FRP वाढल्याने साखरेचा MSP आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला असून याचा साखर कारखान्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

Leave a Comment