Income Certificate Is Mandatory For These Six Schemes – उत्पन्न, हयातीचा दाखला न दिल्यास जुलैपासून निराधारांचे अर्थसाहाय्य बंद.
सहा योजनांचा मिळतो लाभ : मागील वर्षी मिळाले 228 कोटी
उत्पन्न प्रमाणपत्र न दिल्यास या सहा योजनांची पेन्शन बंद
विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी उत्पन्नाचा व हयातीचा दाखला दरवर्षी सादर करावा लागतो. 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत दाखला सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत उत्पन्नाचा व हयातीचा दाखला सादर न केल्यास 1 जुलैपासून निराधारांचे अर्थसाहाय्य बंद होणार आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून अशा 6 योजना निराधारांसाठी कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विविध योजनांचे मिळून जिल्ह्यात 2 लाख 21 हजार 600 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्याना 1 हजार रुपये प्रतिमहिना अर्थसाहाय्य मिळते, तसेच लाभार्थी महिला विधवा व तिला एक अपत्य असल्यास 1100 रुपये व विधवा महिला व दोन अपत्य असल्यास 1200 रुपये अर्थसाहाय्य सरकारकडून मिळते.
कोणत्या योजनेचे किती लाभार्थी
योजना
- संजय गांधी निराधार योजना – 60,748
- श्रावणबाळ निराधार योजना – 1,15,485
- इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना – 43,069
- इंदिरा गांधी विधवा योजना – 2,187
- इंदिरा गांधी अपंग योजना – 111
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना – 382
जिल्ह्यात 2 लाख लाभार्थी
विविध निराधार योजनांचे जिल्ह्यात 2 लाख 21 हजार 600 लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना मागील वर्षी 228 कोटी 87 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना एकरकमी 20 हजार रुपये व इतर योजनाच्या लाभार्थ्यांना प्रतिमहिना 1 हजार रुपये अर्थसाहाय्य मिळते.
दाखला कोठे सादर करायचा?
उत्पन्नाचा दाखला ग्रामपंचायत किंव्हा तहसील कार्यालयात दिला जातो. 50 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असणारे दिव्यांग, तर दारिद्र्यरेषेखाली नसलेले परंतु 21 हजार रुपयांचे उत्पन्न असणारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. उत्पन्नाचा व हयातीचा दाखला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात सादर करायचा आहे.
कोणकोणत्या योजनांचा समावेश?
राज्यात निराधार, अंध, दिव्यांग, शारीरिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, विधवा, परित्यक्ता, वृद्ध व्यक्तीना अर्थसाहाय्य देण्यासाठी राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अशा 2 योजना तर दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यासाठी चार योजना आहेत.
उत्पन्न प्रमाणपत्र व हयातीचा दाखला सादर करण्याची मुदत किती आहे?
1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत दाखला सादर करण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
दाखला कोठे साजरा करायचा आहे?
उत्पन्नाचा व हयातीचा दाखला तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षात सादर करायचा आहे.