Ideas for Maharashtra Budget 2023: मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा आहे. तर आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा? (Ideas for Maharashtra Budget 2023) हे जनता ठरवणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात आजच्या ह्या लेखात.
Ideas for Maharashtra Budget 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्याचे अर्थमंत्री म्हणून 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सातत्याने जनतेत राहणे आणि जनतेच्या मतांना सर्वोच्च प्राधान्य देणे, हे त्यांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. याच भूमिकेतून या आगामी अर्थसंकल्पासाठी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा? यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकडून काही अभिनव संकल्पना (Ideas for Maharashtra Budget) आमंत्रित केल्या आहेत.
महाराष्ट्रातील जनतेला अर्थसंकल्प कसा हवा, हे देवेंद्र फडणवीस जाणून घेणार आहेत. त्यामुळे आता या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या? तुमचे मत तुम्ही मांडू शकणार आहात. तर त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? आपल्या अर्थसंकल्पासाठी अभिनव संकल्पना (Ideas for Maharashtra Budget 2023) कशा मांडाव्या, हे आपण जाणून घेऊयात.
27 फेब्रुवारी पासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे जनतेचे लक्ष आहे. 27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार असून, लवकरच कामकाज सल्लागार समितीत अर्थसंकल्पीय कामकाजाचे वेळापत्रक ठरेल. महाराष्ट्रात आता अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. जिल्हाश: डीपीसी आणि विभागश: वार्षिक आराखड्यासाठी बैठकी पूर्ण झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री, गृहमंत्री, विरोधी पक्षनेता, उपमुख्यमंत्री अशी अनेक पदे भूषविली. पण, अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. आणि या अर्थसंकल्पात त्यांनी जनतेकडून काही अभिनव संकल्पना आमंत्रित केल्या आहेत.
अशा मांडा तुमच्या अर्थसंकल्पीय संकल्पना
या अर्थसंकल्पात तुम्हाला काय हवे आणि तुमच्या नाविन्यपूर्ण संकल्पना कोणत्या? तुमचे मत मांडण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुम्हाला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या “तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023 {Ideas for MahaBudget 2023}” या पोर्टलवर जावे लागेल. पोर्टलवर जाण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
- त्यानंतर “तुमच्या संकल्पनेतील महाबजेट-2023 {Ideas for MahaBudget 2023}” या सदराखाली चित्रात दाखवल्याप्रमाणे एक फॉर्म दिसेल, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे.
या फॉर्म मध्ये तुमचे नाव, तुमचं जिल्हा, तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचा ईमेल आयडी आणि महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 करिता तुमच्या तुमच्या सूचना आणि संकल्पना तुम्हाला मांडाव्या लागणार आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर I’m not Robot” या पर्यायासमोर टिक करून Send/पाठवा या बटणावर क्लिक करून तुम्ही हा फॉर्म सबमीट करू शकता.
तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा असावा? (Ideas for Maharashtra Budget 2023) यासाठी तुमच्या संकल्पना थेट अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवू शकता. या खास मोहिमेच्या माध्यमातून लोकांना आपल्या संकल्पना मांडता येणार आहेत. त्यामुळेच निश्चित जनतेच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात असणार आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर, ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि असाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत?
देवेंद्र फडणवीस हे सध्या अर्थमंत्री आहेत.
महाराष्ट्राचा 2022-23 चा वार्षिक अर्थसंकल्प किती आहे?
2022-23 मध्ये खर्च (कर्ज परतफेड वगळून) 4,95,405 कोटी रुपये असा अंदाज आहे, जो 2021-22 च्या सुधारित अंदाजापेक्षा 9% अधिक आहे (रु. 4,53,547 कोटी). याशिवाय 2022-23 मध्ये राज्याकडून 53,003 कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात येणार आहे.