Maharashtra Board: सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत (HSC Board Exam 2022 Form Felling Started by Maharashtra)
उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) घेवून प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत.
सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे

अ) उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व Pre-list जमा करावयाची तारीख = मंगळवार, दि.28/12/2021
ब) आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन सबमीट केल्यानंतर त्यांना कॉलेज Login मधून Pre-list उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती, जनरल रजिस्टरच्या माहिती नुसार पडताळून अचूक असल्याची खात्री व त्याबाबत Pre-list वर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.
https://www.youtube.com/watch?v=2HBy_CMlAoE