आता UPI ला लिंक करा तुमचे क्रेडिट कार्ड | How to Link Credit Card to UPI

how to link credit card to UPI –  कॅशलेस व्यवहारांना अलीकडे खूप महत्त्व येऊ लागले आहे. मोबाइल बिल, लाइट बिल, किराणा बिल इत्यादींसाठी यूपीआय पेमेंटच केले जाते.

त्यासाठी गुगल पे, फोन पे, पेटीएम, भिम ॲप इत्यादी अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. आता तर क्रेडिट कार्डही अशा प्रकारच्या अॅप्सना लिंक करता येणार आहे.

आरबीआयची परवानगी

अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपे कार्डचा वापर यूपीआय पेमेंट्ससाठी करण्यास मंजुरी दिली. याचाच अर्थ आता युझर्स क्रेडिट कार्डचा वापर यूपीआय पेमेंट्ससाठी करू शकतात.

आता यूपीआय पेमेंट अॅप्सनी क्रेडिट कार्डद्वारा पेमेंट करता येऊ शकेल, अशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. अनेक अॅप्सनी व्हिसा कार्ड्स आणि मास्टरकार्ड्स लिक करण्यास मुभा दिली आहे.

How To Link Credit Card To UPI

सध्या तरी नाही –

  • क्रेडिट कार्ड यूपीआयला लिक करून तुम्ही तूर्त तरी पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीत.
  • नजीकच्या काळात मात्र तसे करता येऊ शकेल.
  • तूर्त मोबाइल बिल, वीज बिल यांसारखी किरकोळ बिले भरण्यासाठी या सुविधेचा उपयोग करू शकतात.

‘गुगल पे’ला असे करा लिंक

  1. तुमच्या स्मार्टफोनवर गुगल पे ओपन करा.
  2. उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी प्रोफाइल आयकॉन असेल त्यावर टॅप करा.
  3. त्यानंतर बँक अकाउंट ऑप्शनवर टॅप करा आणि डेबिट वा क्रेडिट कार्ड अॅड या पर्यायावर क्लिक करा.
  4. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड स्कॅन करू शकता किंवा कार्डाचे तपशील भरू शकता.

Leave a Comment

close button