आधार नंबर माहिती नाही? नो प्रोब्लेम असा शोधा एका मिनटात | How To Find Aadhar Number

How To Find Aadhar Number – आधार कार्ड हे ओळखपत्रासारखे झाले आहे. कुठेही गेलात तरी आधार कार्ड लागतेच. त्यामुळे कोणी थेट आधार कार्डच जवळ बाळगते तर कोणी फोटोकॉपी.

मात्र, असाही प्रसंग ओढवतो की यापैकी काहीच जवळ नाही. त्यातच आधारचा एवढा मोठा क्रमांक आठवण्याचे काही कारणच नाही. अशावेळी काय करायचे.

आधार कार्ड हरवले किंवा विसरले तर…?

 • आधार कार्ड हरवले असेल किंवा कुठेतरी विसरले गेले असेल तर ते
  पुन्हा मिळवता येते.
 • परंतु त्यासाठी आधार कार्डवरील नंबर पाठ असणे आवश्यक आहे.
 • आधार नंबर माहीत नसेल तर तो मिळवता येतो.
 • त्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट जोडणी असलेला मोबाइल असणे गरजेचे आहे.

कसा शोधाल आधार नंबर?

 1. मोबाइल वा संगणकावर https://resident.uidai.gov.in हे टाइप करा.
 2. त्यावरील मायआधार या पर्यायावर क्लिक करा.
 3. स्क्रोल करत खाली जा आणि आधार सर्व्हिस या विभागात जा.
 4. आता या ठिकाणी ‘रिट्राइव्ह लॉस्ट ऑर फरगॉटन यूआयडी या पर्यायावर क्लिक करा.
 5. तुमच्याकडे आलेला ओटीपी आणि कॅप्चा टाकून लॉग-इन बटनवर क्लिक करा.
 6. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर वा ई-मेल पत्त्यावर तुमचा आधार क्रमांक पाठवला जाईल.
 7. त्याची प्रिंट काढा.

Leave a Comment

close button