Hindu Code Bill in Marathi – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बील. 1920 सालानंतर स्वातंत्र्य चळवळीचे सूत्र महात्मा गांधीकडे गेले. त्यानंतर भारतामध्ये स्त्रियांच्या चळवळीला सुरूवात झाली स्त्रियांच्या संघटना बांधल्या गेल्या आणि हिंदू कायद्याप्रमाणे स्त्रियांवर लादलेली गुलामगिरी दूर करण्यासाठी हिंदू कोर्ट सुधारणेची मागणी पुढे येऊ लागली.
महात्माफुले यांनी शिक्षणाचा पाया भारत देशात घातलाच होता व भारतदेशामध्ये ब्रिटिश शासनाने भारतातील चालीरितीमध्ये ढवळाढवळ न करण्याचे धोरण ठेवले होते. त्यामुळे भारताची एकात्मता राखण्यासाठी व भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून हिंदू कोडबीला मध्ये सुधारणा करण्याची मागणी प्रकर्षाने पुढे आली.
Hindu Code Bill in Marathi
सनातन्यांना वप्रस्थापितांना हे बील डॉ. आंबेडकरां सारख्या क्षुद्रांकडून संहित करून घेणे अधर्मिय व अयोग्य वाटत होते त्यांच्या अध्येक्षतेखाली लिहिलेल्या घटनेचा मसुदा भारताने स्वीकारला परंतु हिंदू धर्माच्या पारंपारीक रूढीत ढवळाढवळ केली जाऊ नये म्हणून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद सारखे लोक सदर बाला प्रचंड विरोध करू लागले.
कारण त्यांना हिंदू कायद्यात परंपरेने आलेल्या रूढीत बदल नको होता तसेच प्रस्थापितांच्या प्रतिष्ठेला त्यामुळे धोका निर्माण होणार होता व निवडणुकीमध्ये मतदान होणार नाही म्हणून देखील बीलाला विरोध होत होता. पंतप्रधान नेहरूंनी वचनभंग करून डॉ. आंबेडकरांची निराशा केली तसेच सभागृहाच्या सभापतीने चिडून दिलेल्या राजीनाम्यावर निवेदन करण्यास मज्जाव केला परंतुडॉ.
आंबेडकरांच्या हयातीनंतर सदरबील हे मंजूर झालेल्या स्वरूपात आपल्याला दिसते व आशा रितीने भारतामध्ये असलेल्या लोकसंख्येच्या स्त्रियांना त्यामुळे न्याय मिळालेला आहे. {Hindu Code Bill in Marathi}
हिंदू कोड बिल माहिती मराठी
हिंदू कुटूंब पध्तीच्या मालकीचे स्थावर जंग, मालमत्ता कुटूंबांच्या सदस्यांना वाटप करतांना ठराविक असे नियम नव्हते “मिताक्षर, दायभाग” इ. नियमपध्दती भारतामध्ये अस्तित्वात होत्या मिताक्षर पध्दतीमध्ये वडिलांच्या हयातीत मुलाला संपत्तीची रक्कम मिळू शकते. मात्र स्त्रियांना नव्हे. दायभाग पध्दतीखाली वडिलांच्या मृत्युनंतर फक्त मुलास संपत्तीचा वारसाहक्क मिळत असे.
स्त्रियांना मिळणाऱ्या पोटगीचा हक्क डावलण्यासाठी सतीची चाल प्रबल झाली त्यामुळे स्त्रियांवर अन्याय होत होता. 1944 साली सरकारने “The HinduLaw Cavity” चे पुर्नरुज्जीवन केले.’ परंतु विधेयकाविरूध्द सनातन्यांनी पुन्हा चळवळ सुरू केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदामंत्री होते व हिंदू कोड हे कायदेशीर भाषेमध्ये लिहिण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली प्रत्येक कलम नीट तपासून पुन्हा पुन्हा लिहून काढले. परंतु सनातन्यांनी त्या बिलास ” आंबेडकरस्मृती” असे संबोधले.
Hindu Code Bill in Marathi
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले काही झाले तरी हिंदू कोड बील आम्ही मंजूर करणारच परंतु जीर्णमतवाद्यांनी चिडून जाऊन डॉ. आंबेडकरांच्या विरूध्द वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये अनेक सभासदांची भाषणे अनेक सदस्यांनी डॉ. आंबेडकरांना धारेवर धरले. [Hindu Code Bill in Marathi]
त्यातूनही काहीमहिलासदस्यांनी असे प्रतिपादन केलेकि बिलाची अशीवाताहातलागणार असेलतरवारसाहक्क, स्त्रियांचा इस्टेटीवरील हक्क वगैरे प्रमुख तरतुदीचे काय होणार सदर बीलावर अनेकवेळा संसदेमध्ये चर्चा झाल्या. सनातनी लोक म्हणत असत की आमच्या ईश्वर प्रणित धार्मिक ग्रंथात ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही काही जण म्हणाले त्यामुळे हिंदू मतदार दुखावले जाणार आहेत.
काही जण म्हणाले हिंदूधर्मशास्त्राचे संहितीकरण अस्पृश्य पंडितांनी केले तर वर्णश्रेष्टहिंदूचा अपमान होणार आहे. अशा रितीने झालेल्या विरोधाला मंत्रिमंडळ घाबरले. शासनाने बिलाच्याबाबतीत पडघेतली आणि दोन वर्ष रात्रंदिवस जीवापाड मेहनत घेऊन तयार करण्यात आले त्याचे रूपांतर 20 कायद्यात झाले त्यामध्ये
- सतीप्रतिबंधक कायदा
- हिंदू विधवापुर्न विवाह.
हिंदू कोड बिल माहिती मराठी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे ठरविल्यानंतर त्यांनी पंडित नेहरू यांना पत्र लिहिले व त्यात लिहिले कि सदर बिलाला पहिला मान दिला पाहिजे परंतु नेहरूंनी घाई करू नका असा सल्ला दिल्याने 1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री या पदाचा राजीनामा दिला व पंडित नेहरूंनी सदर राजीनामा मंजूर केला. Hindu Code Bill in Marathi
पुरोगामी विचारसरणीच्या लोकांना अत्यंतवाईट वाटले. दूरगामी विचारसरणीचा नेता होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रातून स्तुतीकरण्यात आली. त्यांना अनभिषिक्त ऋषी म्हणून संबोधण्यात आले. अशारितीने स्वयंप्रकाशित असलेल्या पंडिताला मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. राजीनामा सादर केल्यानंतर त्यावर निवेदने करण्याची संधी डॉ. आंबेडकराना मिळाली उपसभापतींनी ती संधी नाकारली. सभागृहातून बाहेर पडताच आपल्या निवेदनाच्या प्रती त्यांनी वार्ताहरांना वाटल्या.
“नवशक्ती” मध्ये त्याबदलची बातमी आली, “ हिंदू कोडबिला चावून झाला”. आपल्या निवेदनात डॉ. आंबेडकरानी त्यांच्या वर पडलेला बहिष्कार, नसलेलेसंरक्षण, दुःखस्थिती इ. बद्दल लिहिले आहे . नंतरच्या कालावधीत सर्व बील रद्द करण्याऐवजी लग्न घटस्फोट हा भागसंबोधकरण्याचे ठरले. “Hindu Code Bill in Marathi”
डॉ. आंबेडकरांच्या राजीनामा पत्रामधून दिलेल्या कारणामध्ये “हिंदू कोड बीलाचा झालेला वध” हे एक महत्वाचे कारण आहे. आज भारतामध्ये स्त्रियांना जे हक्क प्राप्त झालेले आहेत ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बील जर संसदेत आणलेच नसते तर स्त्रियांना आजही ज्ञानाजर्ना पासून व इतर सर्वच बाबीपासून वंचीत राहावे लागले असते. Hindu Code Bill in Marathi
डॉ. आंबेडकरांच्या राजीनामा पत्रामधून दिलेल्या कारणामध्ये कोणते महत्वाचे कारण आहे?
डॉ. आंबेडकरांच्या राजीनामा पत्रामधून दिलेल्या कारणामध्ये “हिंदू कोड बीलाचा झालेला वध” हे एक महत्वाचे कारण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री या पदाचा राजीनामा कधी दिला?
1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदामंत्री या पदाचा राजीनामा दिला