शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पिकांच्या हमीभावात वाढ | Hami Bhav 2022 List Maharashtra

Hami Bhav List Maharashtra

Hami Bhav 2022 List Maharashtra: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. अशा वेळी मोदी सरकारने आगामी रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची घोषणा केलीय.

विपणन हंगाम 2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) केंद्रीय मंत्रिमंडळाने केली वाढ विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देणे हे किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी वाढ) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MSP increase the government

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील  आर्थिक व्यवहारविषयक  मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व  रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीमध्ये (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली आहे.

शेती उत्पादकांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावा यासाठी सरकारने रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. Hami Bhav 2022 List Maharashtra

मागील वर्षाच्या तुलनेत मसूर ,रॅपसीड आणि मोहरी  (प्रत्येकी 400 रुपये प्रति क्विंटल) आणि हरभरा (130 रुपये प्रति क्विंटल) या पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत सर्वाधिक संपूर्ण  वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

येथे क्लिक करा »  आता व्हॉट्सॲप वर डाऊनलोड करा तुमची कागदपत्रे फक्त 2 मिनटात | How to Download Documents From WhatsApp

करडईच्या बाबतीत, हमीभावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल 114 रुपयांची वाढ झाली आहे.विविध प्रकारची पिके घेण्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने, विविध पिकांसाठी वेगवेगळी किमान आधारभूत किंमत देण्याचा उद्देश आहे.

यावेळी तेलबियांमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांनी वाढ करून 4,650 रुपये करण्याची घोषणा केली आहे.

त्याचबरोबर मसूरही 400 रुपयांनी वाढून 5,100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. बार्लीची एमएसपी 1600 रुपयांवरून 1635 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सूर्यफुलावरील एमएसपी 114 रुपये प्रति क्विंटलने वाढवून 5,327 रुपये प्रति क्विंटल केली आहे.

Hami Bhav 2022 list maharashtra

विपणन हंगाम 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (रु. क्विंटलमध्ये)

पिके RMS 2022 साठी MSP

 

आरएमएस 2022-23 साठी एमएसपी

 

उत्पादन खर्च* 2022-23 MSP मध्ये वाढ

(पूर्ण)

खर्चापेक्षा जास्त परतावा (टक्के मध्ये)
गहू 1975 2015 1008 40 100
जवस 1600 1635 1019 35 60
हरभरा 5100 5230 3004 130 74
मसूर 5100 5500 3079 400 79
Rapeseed &

मोहरी

4650 5050 2523 400 100
सूर्यफूल 5327 5441 3627 114 50

सर्वसमावेशक खर्चाचा संदर्भ देत, मजुरांची मजुरी , बैल किंवा यंत्राद्वारे केलेल्या आणि अन्य  कामांची मजुरी , भाडेतत्वार घेलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, सेंद्रिय खते, सिंचन शुल्क यासारख्या भौतिक साहित्याच्या वापरावर झालेला खर्च,अवजारे आणि शेत बांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावर व्याज, पंप संच इत्यादींसाठी डिझेल/वीज इ., विविध खर्च आणि कौटुंबिक श्रमांचे मूल्य याचा सर्व देय खर्चामध्ये  समावेश आहे. Hami Bhav 2022 List Maharashtra

हमीभावात वाढ करण्याची घोषणा

शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर मोबदला मिळावा या उद्देशाने, किमान आधारभूत किंमतीत देशभरातील सरासरी उत्पादन खर्चाच्या दीडपट वाढ निश्चित करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2018-19 मध्ये करण्यात आली होती

या घोषणेच्या अनुरूप,  रब्बी विपणन हंगाम  2022-23 साठी रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा हा निर्णय  घेण्यात आला आहे. {Hami Bhav 2022 List Maharashtra}

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर अपेक्षित मोबदला गहू , रॅपसीड आणि मोहरी (प्रत्येकी 100%) त्यानंतर मसूर (79%); हरभरा (74%); जव (बार्ली) (60%); करडई (50%)या पिकांच्या  बाबतीत सर्वाधिक मिळण्याचा अंदाज आहे.

मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन राखण्याच्या दृष्टीने, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिके घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  तसेच  सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या दृष्टीने तेलबिया, डाळी आणि भरड धान्यांसाठी किमान आधारभूत किंमतीची  पुनर्रचना करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये एकत्रित प्रयत्न करण्यात आले.

याव्यतिरिक्त, खाद्यतेल-पामतेल राष्ट्रीय अभियान (NMEO-OP), हे सरकारने अलीकडेच जाहीर केलेली केंद्रीय पुरस्कृत योजना असून  खाद्यतेलांचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यास आणि आयातीवरील  अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल.

या योजनेसाठी  11,040 कोटी रुपयांची तरतूद असून यामुळे पीक क्षेत्र आणि उत्पादकता वाढवण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती वाढविण्यास मदत करेल.

2018 मध्ये सरकारने जाहीर केलेली “प्रधानमंत्री अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान” (PM-AASHA) ही एकछत्री योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य मोबदला देण्यास सहाय्य्यकारी ठरेल.

एक छत्री योजनेमध्ये प्रायोगिक तत्वावर तीन उपाययोजना म्हणजेच किंमत आधारभूत योजना पीएसएस), किंमत किमान देय योजना (पीडीपीएस) आणि खाजगी खरेदी आणि साठवणूक योजना (पीपीएसेंस) यांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

close button
Scroll to Top