GST Rates Revised: आजपासून महागाईचा धो धो पाऊस जीएसटी दरात आजपासून बदल, जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग?

GST Rates Revised – आजपासून महागाईचा धो धो पाऊस जीएसटी दरात आजपासून बदल, जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग?

GST Rates Revised

गॅस सिलिंडरच्या आडून स्वयंपाकघरात भडकलेली महागाई आता जीएसटीच्या रूपात सर्वसामान्यांना रडवणार आहे. सरकारी तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या अनेक खाद्यपदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणले आहे.

त्यानुसार सोमवार, 18 जुलैपासून पॅक आणि लेबल लावलेले पीठ, दही, लस्सी, पनीर यांसारखे खाद्यपदार्थ, हॉस्पिटलमधील वॉर्डचे भाडे आदींवर 5 टक्के, हॉटेलच्या रूमभाड्यावर 12 टक्के तर एलईडी लाईट्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न देशातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.

अशा प्रकारे होणार जीएसटी आकारणी

5 टक्के – पाकीटबंद आणि लेबल केलेले मासे (फ्रोझन वगळता), दही, पनीर, लस्सी, मध, सुके सोयाबीन, मटार, गहू व इतर अन्नधान्य.

त्याचबरोबर रोप वेद्वारे माल आणि प्रवाशांची केली जाणारी वाहतूक, शस्त्रक्रियेची उपकरणे, हॉस्पिटलमधील नॉन-आयसीयू वॉर्डचे प्रतिदिन पाच हजारहून अधिक भाडे, प्रतिदिन एक हजार रुपयांपर्यंतचे हॉटेल खोली भाडे. “GST Rates Revised”

12 टक्के – सोलर वॉटर हीटर, नकाशे, चार्ट, इंधन खर्चासह मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक व इतर वाहनांचे भाडे, जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया सुविधा, गोदामातील ड्रायफ्रुट्स, मसाले, गूळ, कापूस, ताग, तंबाखू, तेंदूपत्ता, चहा, कॉफी इत्यादींच्या साठवणुकीच्या सेवा.

18 टक्के – एलईडी लाईट्स – लॅम्प्स, टेट्रा पॅक, बँकांमार्फत दिले जाणारे चेकबुक, प्रिंटिंग / ड्रॉइंग शाई, धारदार चाकू, पेपर कटिंग चाकू, चमचा, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, केक सर्व्हिस, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने तसेच रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, कचरा प्रक्रिया संयंत्र आणि स्मशानभूमीसाठी जारी केले जाणारे कामाचे कंत्राट, कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदामांमध्ये केली जाणारी धूम्रफवारणीची सेवा, आरबीआय, आयआरडीए व सेबीच्या सेवा तसेच घर भाड्याने देणे. [GST Rates Revised]

आजपासून जीएसटी रडवणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची गेल्या महिन्यात बैठक झाली. त्या बैठकीत जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या सोमवारपासून केली जात आहे. त्यानुसार दुग्धजन्य पदार्थांसह अनेक वस्तूंवर पहिल्यांदाच जीएसटी लावला जात आहे. GST Rates Revised

त्यामुळे दही- लस्सीपासून ते हॉस्पिटलमधील उपचारापर्यंत अनेक वस्तू व सेवांसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या तथा ब्रॅण्ड नसलेल्या उत्पादनांवर तेवढी जीएसटी सूट कायम ठेवण्यात आली आहे. काही वस्तू व सेवांवरील सध्याचा 12 टक्क्यांचा कर 18 टक्क्यांवर वाढवला आहे.

आजपासून महागाईचा धो धो पाऊस जीएसटी दरात आजपासून बदल, जाणून घ्या काय स्वस्त आणि काय महाग

सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेज अॅण्ड कस्टम्सच्या नव्या अधिसूचनेनुसार अनेक खाद्यपदार्थांवर जीएसटीचा भुर्दंड लावण्यात आला आहे. आधीच गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांना बेजार केले आहे, त्यात जीएसटीमुळे अनेक वस्तूंची दरवाढ होत असल्याने उदरनिर्वाह करताना सर्वसामान्यांची प्रचंड दमछाक होणार आहे. GST Rates Revised

ईशान्येकडील राज्यांमध्ये जाणाऱ्या विमानांमध्ये केवळ इकॉनॉमिक क्लासचा प्रवास जीएसटीमुक्त असेल, तर बिझनेस क्लाससाठी 18 टक्क्यांच्या जीएसटीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. हॉस्पिटल्स, नर्सिंग होममधील आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या वैद्यकीय सेवाही जीएसटीच्या कक्षेत आणल्या गेल्यामुळे केंद्र सरकारविरोधात जनतेतून तीव्र नाराजीचा सूर आळवला जात आहे.

Leave a Comment

close button