Gratuity update – आता फक्त एक वर्ष काम केल्यावरही मिळणार ग्रॅच्युईटी मोदी सरकारचा नोकरदारांना दिलासा. ग्रॅच्युईटीसाठी कोणत्याही संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याची सक्ती राहणार नसून फक्त एक वर्ष काम केल्यावरही ग्रॅच्युईटी मिळणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारने नोकरदारांसाठी हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही गुड न्यूज असून, हा मोठा दिलासा असल्याचे सांगितले जात आहे.
Gratuity update
देशातील कामगार सुधारणांसाठी केंद्र सरकार लवकरच चार नवीन कामगार संहिता लागू करणार आहे. याबाबतची माहिती कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली आहे. अनेक राज्यांनी वेगवेगळ्या संहितांना संमती दिली आहे. यानंतर लवकरच केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करू शकते, असे सांगितले जात आहे. {Gratuity update}
नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्यईटी यांच्यात बदल होणार आहेत. या अंतर्गत कामाचे तास आणि आठवड्याचे नियम बदलण्याची शक्यता आहे.
त्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यईटीसाठी कोणत्याही संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याची सक्ती राहणार नाही. सरकारने अद्याप त्याची घोषणा केलेली नाही; परंतु नवीन कामगार कायदा लागू होताच हा नियम लागू होणार आहे.
केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांनाच लाभ
कोणत्याही कर्मचाऱ्याने कोणत्याही ठिकाणी एक वर्ष काम केले, तर त्याला ग्रॅच्युईटी मिळेल. सरकारने ही व्यवस्था निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच कंत्राटावर काम करणाऱ्यांसाठी केली आहे. Gratuity update
एखादी व्यक्ती एका कंपनीसोबत एका ठरावीक कालावधीसाठी करारावर काम करत असेल, तर त्याला ग्रॅच्युईटी मिळेल. याशिवाय ग्रॅच्यईटी कायदा 2020 चा लाभ केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे. “Gratuity update”
किती वर्ष काम केल्यावर ग्रॅच्युईटी मिळणार आहे?
आता फक्त एक वर्ष काम केल्यावरही ग्रॅच्युईटी मिळणार.
ग्रॅच्यईटी कायदा 2020 चा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळेल?
ग्रॅच्यईटी कायदा 2020 चा लाभ केवळ फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना मिळेल.