बॅंक, रेल्वे, पोलिस, मिलिटर LIC, भरती साठी फ्री एज्युकेशन/ कोचिंग तसेच स्कॉलरशिप सुद्धा मिळेल

 मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषनेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत यादिसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Bank, Railways, Police, Military LIC, Free Education / Coaching for Recruitment as well as Scholarships)

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, aptitude test, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी दि. 9 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल.

या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील.

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल.

इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बार्टीच्या प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरु: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार दि. 28.10.2021 च्या शासन निर्णयास अनुसरून राज्यात व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

बार्टी मार्फत अनुसूचीत जातीच्या उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी प्राप्त होण्याकरिता खालीलप्रमाणे दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. प्रशिक्षणास अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

  1. बँक, रेल्वे, एलआयसी ई व तत्सम Aptitude Test वर आधारीत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कालावधी: 6 महीने पात्रता: किमान 12वी.
  2. पोलिस व मिलिटरी भरती परीक्षा प्रशिक्षण
  3. प्रशिक्षण कालावधी: 4 महीने पात्रता : किमान 10वी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 6000/- रुपये स्टायपंड, मोफत अभ्यास साहित्य. पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांना 3000/- रुपये बूट व इतर साहित्य घेण्याकरिता अतिरिक्त मिळतील.

अधिक माहिती करिता आपल्या नजिकच्या केन्द्राला संपर्क करा. काही जिल्ह्यांचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत किंवा या जिल्ह्यंमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. https://forms.gle/AxBo6JKyqtAQe3FeA

अर्ज करण्याची मुदत 09.12.2021 पर्यन्त आहे. Screening Test 12.12.2021 ला घेतली जाणार आहे.

ही माहिती आपले मित्र व नातेवाईक यांना फॉरवर्ड करा. AMBEDKARITE EDUCATORS GROUP(AEG) MAHARASHTRA.

टिप: राज्यातील सर्व केंद्रांचा पत्ता व संपर्क बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा याचा नमुना व व्हिडिओ पहा👇👇👇👇👇

Leave a Comment