Freedom fighters pension 20 thousand per month – राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना 10 हजार रुपयांऐवजी दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल.
Freedom fighters pension 20 thousand per month
भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे 74.75 कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील 6229 स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.
भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन 1965 पासून सुरु केली आहे. त्यानुसार 2 ऑक्टोबर 2014 पासून दरमहिन्याला 10 हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येते.
स्वातंत्र्य सैनिकांना 10 हजार रुपयांऐवजी दरमहा किती रुपये निवृत्ती वेतन मिळेल?
स्वातंत्र्य सैनिकांना 10 हजार रुपयांऐवजी दरमहा 20 हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल.
या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील किती स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल?
या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील 6229 स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होईल.