फेरफार काढा ऑनलाईन घर बसल्या | Ferfar Online Maharashtra

Ferfar Online Maharashtra – फुकटात करा आता ई-फेरफार; पैसा अन वेळेची होणार बचत ! ई-हक्क प्रणाली विकसित : शेतकऱ्यांची आता गैरसोय थांबणार.

Ferfar Online Maharashtra

परभणी महसूल प्रशासनातील कामाला गती यावी, त्याच बरोबर काम अधिक पारदर्शक व्हावे, यासाठी शासनाने ई- हक्क प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली अंतर्गत शासनाने आता शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे विविध 9 प्रकारचे फेरफार ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना महसूलची कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सातबारा काढण्यासाठी तलाठयांची शहरातील कार्यालये गाठून वेळ व पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांची या सर्व समस्यांमधून मुक्तता व्हावे, यासाठी ई- हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. “Ferfar Online Maharashtra”

या प्रणालीअंतर्गत शेतकऱ्यांना आता घर बसल्या ई करार नोंदी, आपल्या सातबारांवर बोजा चढविणे, कमी करणे, वारसा नोंद घेणे, मृताचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंब करता नोंद कमी करणे संगणकीकृत सातबारामधील चूक दुरुस्त करणे या बरोबरच फेरफारची कामेही आता घरबसल्या फुकटात करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसाही बचत होणार आहे.

ऑनलाइन प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित

संबंधितांनी आपला ऑनलाईन भरलेला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी त्या त्या भागातील तलाठी करतील. त्यानंतर फेरफार मंजूर करण्याची कार्यवाही 15 दिवसात करणे अपेक्षित आहे. त्रुटी असल्यास अर्ज परत पाठविला जाणार आहे.

ई-फेरफार कसा करणार

  • राज्य सरकारच्या डिजीटल सातबारा या संकेतस्थळावर जावून अर्ज करता येणार आहे. या माध्यमातून आपल्या सुविधा मिळेल. Ferfar Online Maharashtra
  •  आवश्यक कागदपत्रे अपलोड करून नोंदणी केलेल्या मोबाईलवर अर्ज क्रमांक व पोहच मिळणार आहे. पडताळणी झाल्यावर फेरफारचे काम ऑनलाईन होईल.

अडवणूक थांबणार

मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील अनेक मंडळ अधिकारी व तलाठ्यांकडून फेरफारसाठी शेतकयांची अडवणूक केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

मात्र आता ऑनलाईनची सुविधा उपलब्ध करून दिल्याने संबंधिताकडून होणारी शेतकयांची अडवणूक थांबणार आहे.

पिळवणूक टाळण्याची महसूलची प्रणाली

फेरफारसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाच्या सज्जा किवा शहरातील कार्यालयात अनेक खेट्या घालाव्या लागतात. संबंधितांची ही पिळवणूक टाळण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाने ही अद्यायावत प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे सर्वच शेतकयांची पिळवणूक थांबवणार आहे. “Ferfar Online Maharashtra”

तलाठ्यांसह शेतकऱ्यांची कामे होणार सोपी

ई- डिजीटल इंडिया अभियानांतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. त्यामुळे कुठलेही शुल्क न आकारता शेतकऱ्यांना ई- हक्क प्रणाली अंतर्गत अर्ज करुन तलाठ्यांना फेरफारमध्ये रुपांतरीत करता येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसह तलाठ्यांची कामे सोपी झाली आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे. त्यामुळे ऑनलाईन सेवा शेतकरी व लाभार्थ्याच्या हिताचे असल्याने दिसून येत आहे. “Ferfar Online Maharashtra”

कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

फेरफारसाठी आता शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण ऑफलाईन अर्ज स्वीकारू नयेत. ऑनलाईन काम करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिल्या आहेत.

महसूल विभागाच्या या सेवा ऑनलाईन

डिजीटल इंडिया अभियानांतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाल्या. त्यामुळे आता कुठलेही शुल्क न आकारता शेतकयांना आता आपल्या सातबारावर बोजा चढविणे, नावे वगळणे, वारस नोंदविणे, विश्वस्ताचे नाव बदलणे.

संगणकीकृत सातबारामधील चूक दुरुस्त करणे आदी ९ प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना ऑनलाईन फुकटात घरबसल्या मिळणार आहेत.

फेरफार काढण्यासाठी कुठे जावे लागले का?

नाही, तुम्ही फेरफार मोबाईल मधून डाऊनलोड करू शकता.

फेरफार कोणत्या वेबसाईट वरून डाउनलोड करता येईल?

डिजिटल ७/१२ च्या वेबसाईट वरून फेरफार डाऊनलोड करता येतो.

Leave a Comment

close button