E peek pahani update – ई-पीक पाहणीची अट शिथिल, सरसकट मदत.
E peek pahani update
जे शेतकरी ई पीक पाहणीपासून वंचित राहिले आहेत, त्यांनाही सरसकट मदत देऊनई पीक पाहणीची अट शिथिल केली जाईल, असे सांगत शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.
मंगळवारी तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव अतिवृष्टी, परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी विखे यांनी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पीक विम्यासंदर्भात लवकरच सर्व विभागांच्या धकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक बोलावण्यात येईल. तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.