आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी शिकवण्यासाठी येणार विद्यार्थी | E Peek Pahani Maharashtra

E Peek Pahani Maharashtra – पीक नोंदणीसाठी सरसावले कृषी पदवी.

E Peek Pahani Maharashtra

सातबारावर पीक नोंदणीसाठी तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता नसून ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी करणे सुलभ झाले आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या या सुविधेत आतापर्यंत 75 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

हे प्रमाण आणखी वाढावे, यासाठी कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यात सात बारा उतारा असणारे सुमारे अडीच कोटी खातेदार आहेत.

ई पीक पाहणी अॅप सुरू झाल्यापासून सुमारे 1 कोटी 10 खातेदारांनी या अॅपवर नोंदणी केली. त्यापैकी 75 लाख शेतकरी आहेत. या अॅपमध्ये प्रत्येक हंगामासाठी पिकाची नोंदणी करता येते. यामुळे शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर पिकांची अचूक नोंदणी होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबतच महसूल, कृषी विभागालाही होते.

आता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी शिकवण्यासाठी येणार विद्यार्थी

नैसर्गिक आपत्तीत शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी या नोंदणीचा आधार घेतला जाणार आहे. नोंदणीचे हे फायदे आता शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी, जागृतीसाठी तसेच यावर्षीच्या खरीप हंगामात जास्तीत आहे.

त्यानुसार राज्यातील 150 कृषी जास्त शेतकऱ्यांची नोंदणी व्हावी, या महाविद्यालयातील सुमारे 12 हजार उद्देशाने आता जमाबंदी आयुक्तालयाने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले कृषी पदवीधरांची मदत घेण्याचे ठरवले आहे.

एकूण खातेदारांपैकी काही खातेदार बिगरशेती असलेले आहेत. ते वगळून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 65 टक्के आहे. उर्वरित 35 टक्के खातेदारांना या नोंदणीत सामावून घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या अखेरीस ही नोंदणी 100 टक्के करण्याचे लक्ष्य आहे.

Leave a Comment

close button