डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2024

By Shubham Pawar

Published on:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती/नवबोध्द शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवन व मान उंचावण्यासाठी अशा योजना शेतक-यांना शेतीसाठी राबवल्या जातात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्थसहाय्य देण्याची सन १९८२-८३ पासून राबविण्यात येत असलेली अनुसुचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) बदललेल्या परिस्थीतीत शेतक-यांची आवश्यकता विचारात घेता सदर योजना सुधारित करुन

\’dr babasaheb ambedkar swavalamban yojana\’  या नावाने संदर्भाय दि. ५ जानेवारी, २०१७ चे शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.

नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जुनी विहीर दुरुस्ती अनुदान योजना, इनवेल बोरिंग, तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, पंप संच या सर्वसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? हे जाणून घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुदान

dr babasaheb ambedkar swavalamban yojana  जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी

डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

  • या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख) अनुदान आहे.
  • जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार) अनुदान आहे.
  • इनवेल बोअरींग (रु.20 हजार) अनुदान आहे.
  • पंप संच (रु.20 हजार) अनुदान आहे.
  • वीज जोडणी आकार (रु.10 हजार) अनुदान आहे.
  • शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) अनुदान आहे.
  • सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार) अनुदान आहे.
  • पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/) अनुदान आहे.

टीप – सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

 

🔴mahadbt अर्जदार नोंदणी कशी करावी व्हिडिओ – https://youtu.be/AbVApNQRifQ

🔴 mahadbt कागदपत्रे upload कशी करावी हा व्हिडिओ पहा – https://youtu.be/1ayUbRUKi1Q

लाभार्थी पात्रतेच्या अटी

  • शेतक-याकडे सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
  • ज्या शेतक-यांना नविन विहीर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान ०.४० हे शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतक-यांना नवीन विहीर व्यतिरीक्त इतर घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान ०.२० हे शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • सदर योजनेंतर्गत कमाल शेतजमीनीची अट ६.०० हे आहे.
  • नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका पात्र नाही  \”dr babasaheb ambedkar swavalamban yojana\”
  • लाभार्थ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

पात्रता

  •  लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  •  उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
  • लाभार्थ्यांचे बँक खाते असणे व सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  • स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनांतर्गत जमीन वाटप झालेल्या शेतक-यांनाया योजनेचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा.
  • ज्या शेतक-यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रुपये १,५०,०००/- चे मर्यादेत आहे अशा शेतकयांनी संबंधीत तहसिलदार यांचेकडून सन 2024-25 चे उत्पन्नाचा अद्यावत दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहिल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना कागदपत्रे

नवीन विहीर याबाबीकरीता: dr babasaheb ambedkar swavalamban yojana

    • 1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र

 

    • 2) 7/12 व 8-अ चा उतारा

 

    • 3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).

 

    • 4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)

 

    • 5) अपंग असल्यास प्रमाणपत्र

 

    • 6) तलाठी यांचेकडील दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.

 

    • 7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.

 

    • 8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र

 

    • 9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र

 

    • 10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).

 

    • 11) ग्रामसभेचा ठराव.

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता

    • 1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.

 

    • 2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).

 

    • 4) ग्रामसभेचा ठराव. dr babasaheb ambedkar swavalamban yojana
      3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    • 5) तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.

 

    • 6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).

 

    • 7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र

 

    • 8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र

 

    • 9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)

 

    • 10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.

 

    • 11) अपंग असल्यास प्रमाणपत्र

शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता

    • 1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.

 

    • 2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).

 

    • 4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.

 

    • 5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)

 

    • 6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी

 

    • 7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)

 

    • 8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)

 

    • 9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र

 

    10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.

 

    • Topics
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुदान Subsidy, पात्रता Eligibility, कागदपत्रे Documents, अर्जदार नवीन नोंदणी Registration, अर्जदार लॉगिन, अर्ज व बाबी निवडा घटक निवडा, नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, ऑनलाईन अर्ज करा अर्ज केला पण महत्वाची माहिती
शासन निर्णय (GR) - dr babasaheb ambedkar swavalamban yojana GR

अर्ज करण्यासाठी वेबसाईट - https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

1 thought on “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2024”

Leave a comment