शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा, 5 लाख शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 15 हजार रुपये : Dhan Bonus Maharashtra 2022

Dhan Bonus Maharashtra 2022: मित्रांनो, सध्या राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरू असून, या अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. शेतकर्‍यांना हेक्टरी 15 हजार रुपये रुपये बोनस अनुदान (Dhan Bonus Maharashtra 2022) देण्याची मोठी घोषणाही यात करण्यात आली. तर कोणत्या शेतकर्‍यांना हे अनुदान मिळणार? शेतकर्‍यांसाठी करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा कोणत्या? हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.

Dhan Bonus Maharashtra 2022

हिवाळी अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत शेतकरी आत्महत्या, पीक विमा योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, संत्र्यावरील प्रक्रिया उद्योग आणि सोयाबीन – कापूस यासंदर्भात भाष्य केलं. हिवाळी अधिवेशन नागपूरला होत असल्यानं विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना {Dhan Bonus Maharashtra 2022} दिलासा देण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. Dhan Bonus Maharashtra 2022

या शेतकर्‍यांना मिळणार लाभ

सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी १५ हजार रुपये {Dhan Bonus Maharashtra 2022} या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस 15 Hajar Bonus Anudan म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. बोनस रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजूरी दिली आहे, अशी माहिती देखील शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्र सरकारला विनंती
  • नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ शक्तीपीठ महामार्ग विकसित करणार. यामुळे मराठवाडा देखील जोडला जाईल. तसेच दक्षिण भारत थेट मध्य महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे.
  • नागपूर हे शहर ‘लॉजिस्टिक हब ‘ म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात ‘लॉजिस्टिक सपोर्ट ‘ तयार होणार आहे.
  • नागपूर मेट्रो पहिला टप्पा लोकार्पण आणि दुसऱ्या टप्प्याचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
  • नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-1 ला सुधारित ९२७९ कोटींच्या खर्चास मान्यता
  • वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या सुधारित खर्चास मान्यता. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाचा हिस्सा.
  • विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना. ७० हजार कोटीच्या रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता. त्यापैकी विदर्भामध्ये एकूण ४४ हजार १२३ कोटी रुपयांची गुंतवणूक. ४५ हजार रोजगार निर्मिती होणार.
  • गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटी गुंतवणुकीचा खनिज उत्खनन प्रकल्प सुरू होईल. राज्याला महसूल मिळेल. रोजगारामुळे नक्षलवाद संपृष्टात येईल.
  • सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी ७५५ कोटी रुपये निधी वितरित
  • अमरावती, नागपूर पुणे विभागातील १४ जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २२२ कोटी ३२ लाख रुपये वितरित.
  • सोयाबीनवर शंखी गोगलगाईमुळे ५ जिल्हयात ७३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित. ९८.५८ कोटी इतका निधी.
  • भंडारा जिल्ह्यातील सुरेवाडा उपसा सिंचन योजनेस गती देण्यासाठी ३३६ कोटी २२ लाख सुधारित खर्चास मान्यता.
  • बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित मान्यता, यामुळे सुमारे १९१८ हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.
  • लोणार सरोवराच्या पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्यासाठी ३६९ कोटी ७८ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी.
  • राज्यातील जैवविविधता प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर येथे सुरु करण्यात येणार विदर्भाचं म्हणून एक वेगळेपण आहे. खनिज, उर्जा, पाणी, वन, शेती ही विदर्भाची बलस्थानं आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन क्षेत्रात विदर्भात क्रांती झालेली आपण पाहाल, आणि याची सुरुवात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे.

शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यु चेन्स (मुल्य साखळी) विकसित करण्यात येतील.
  • सध्या शेतीशाळा, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके यातून विविध व्हॅल्यु चेन्स आम्ही विकसित करत आहोत. या योजनेत शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करण्यात येत असून, जीनिंग आणि प्रेसींग युनीट ड्रोन द्वारे औषध फवारणी करण्यासाठी अनुदान, बीजप्रक्रिया युनीट, तेलघाणा प्रक्रिया युनीट, जैविक निविष्ठा निर्मितीकरिता मास्टर लॅब आणि बेसिक लॅब स्थापन करणे अशा विविध गोष्टींची सांगड घालणार.
  • कापूस आणि सोयाबीन व्हॅल्यु चेन्स विकसित करण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांपर्यंत भरीव अशी वाढीव तरतूद करण्यात येईल. ही योजना 2025 पर्यंत राबवण्यात येईल.
  • संभाजीनगर येथे मोसंबी, संत्रा पिकासाठी सिट्रस इस्टेट स्थापन केली असून. 9 कोटी 20 लाख रुपये खर्च झाले आहेत.
    राज्यात संत्र्यावरील दोन प्रक्रिया प्रकल्पांना 71 लाख रुपये अर्थसहाय्य केले असून, चालू आर्थिक वर्षात 115 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. याशिवाय प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रिया योजनेत 18 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
  • अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्हयात 72 हजार 469 हेक्टर संत्र्यांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई म्हणून 562 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. संत्र्यावरील कोळशी रोगाचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कृषी विभाग जनजागृती करत आहे.
    प्रधानमंत्री पिक विम्याच्या बाबतीत 2 हजार 352 कोटी नुकसान भरपाई निश्चित झाली असून, त्यापैकी 2 हजार 25 कोटी रुपयांची रक्कम 45 लाख 83 हजार 883 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.
  • फलोत्पादनाला प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्राला पॅरामीटर्स सुधारित करण्याची विनंती केली आहे.
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेत डिसेंबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीतील तेरावा हप्ता देण्याची कार्यवाही सुरु आहे. 1 कोटी 97 लाख पात्र लाभार्थी पैकी 92 हजार लाभार्थींचा डाटा अद्ययावत करण्यात आला असून, उर्वरित 8 लाख 6 हजार लाभार्थींचा डाटा अद्ययावत करणे सुरु आहे.
  • शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. एकजरी आत्महत्त्या झाली, तरी त्याचं दुःख आहे. शेतकरी आत्महत्या होऊ नये म्हणून शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना, कालबद्ध अंमलबजावणी. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला अधिक मजबूत करण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून या आत्महत्या कमी कशा होतील, याचा प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून त्यांच्याशी संवाद साधणे, कौन्सिलींग करणे यासाठी समाजातील तज्ज्ञांना देखील सहभागी करून घेण्यात येईल.
  • आज बळीराजाला इतकच सांगणं आहे

    खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रेआली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे ,

    अशी सादही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काही ओळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घातली.

तर मित्रांनो, अशाप्रकारे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी 15 हजार रुपये बोनस (Dhan Bonus Maharashtra 2022) देण्याची तसेच शेतकर्‍यांसाठी विविध घोषणा केल्या आहेत. अशाच उपयुक्त माहितीकरिता आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

close button