तुमचे आधार कार्ड कुठे वापरले जाते लगेच चेक करा | Check immediately where your Aadhar card is used

Check immediately where your Aadhar card is used

Check Immediately Where Your Aadhar Card Is Used – देशातील प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड हे आता महत्त्वाचे कागदपत्र झाले आहे. या स्थितीत त्याची सुरक्षा करणे अत्यावश्यक बनले आहे.

सध्या आधार कार्डचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने आपले आधार कार्ड कुठे-कुठे वापरले जात आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

कुठे माहिती मिळेल

यूआयडीएआय या आधार कार्डचे काम पाहणाऱ्या संस्थेने तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरले जात आहे, हे पाहण्याची सुविधा दिली आहे.

यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर, तुम्हाला आधार प्रमाणीकरण हिस्ट्री टूल मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डचे तपशील तपासू शकता. यात तुम्हाला तुमचे आधार कुठे वापरले गेले आहे हे कळू शकते.

कसे तपासणार

  • सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा.
  • माय आधार टॅबमध्ये, तुम्हाला आधार सेवा चा पर्याय दिसेल, येथे ‘Aadhaar Authentication History या पर्यायावर क्लिक करा.
  • येथून एक नवीन पान उघडेल, जिथे तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
  • त्यानंतर कॅप्चा कोड टाका. ‘जनरेट ओटीपी’ बटणावर क्लिक केल्यानंतर दुसरे पेज उघडेल,
  • येथे तुम्हाला मागील व्यवहारांचे तपशील पाहण्याचा पर्याय मिळतील.
  • त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागेल.
  • यानंतर, गेल्या काही दिवसांमध्ये जिथे जिथे आधार कार्ड वापरले गेले त्याची तारीख, वेळ आणि ऑथेंटीकेशन प्रकार मिळेल. तुम्ही एका वेळी फक्त ५० व्यवहारांचे तपशील जाणून घेऊ शकाल.
  • हे व्यवहार पाहून तुम्ही हे सर्व व्यवहार स्वतः केले आहेत की काही संशयास्पद कृती घडली आहे हे तुम्हाला कळू शकते.

मास्क्ड आधार कशी करते सुरक्षा

सुरक्षेच्या दृष्टीने यूआयडीएआयने आधार कार्डची फोटोकॉपी देण्याऐवजी ‘मास्वड केलेले आधार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. मास्क केलेल्या आधारमध्ये आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसतात.

हे यूआयडीएआयच्या https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकते. हॉटेल्स किंवा फिल्म हॉलसारख्या परवाना नसलेल्या खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत ठेवण्याची परवानगी नाही.

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top