13 व्या हप्त्याआधी करा हे महत्त्वाचे काम, तरच मिळेल पीएम किसानचा पुढील हप्ता | Check Aadhar Bank Linking Status

Check Aadhar Bank Linking Status: मित्रांनो, केंद्र शासनाद्वारे शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. तर शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य मिळावे, म्हणून केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. शेतकर्‍यांसाठी सुरू असलेली केंद्र सरकारची ही सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय योजना आहे. या योजनेद्वारे शासन शेतकर्‍यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपये याप्रमाणे वार्षिक 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य देत असते.

Check Aadhar Bank Linking Status

या योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते वितरित करण्यात आले असून, 10 व्या हप्त्यापासून या योजनेत बोगस लाभार्थी वगळण्यासाठी लाभार्थी शेतकर्‍यांना PM Kisan e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम किसान केवायसी केल्यानंतर पीएम किसान योजनेत मोठे बदल झाले असून, ज्यांनी केवायसी केली आहे, आणि त्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहेत, अशा लाभार्थ्यांचे पेमेंट मोड आधार झाले आहे. त्यामुळे त्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे आता आधार लिंक असलेल्या बँक खात्यातच जमा होत आहेत. आणि ज्यांचे आधार बँक खात्यास लिंक नसेल तर मात्र त्यांना आता पीएम किसानचा पुढील हप्ता मिळणार नाही आहे.

तर मित्रांनो, तुमचे आधार क्रमांक DBT पेमेंट येण्यासाठी कोणत्या खात्याशी लिंक (Aadhar Bank Linking Status) आहे, हे कसे चेक करावे? आणि लिंक नसेल तर काय करावे ह्याची माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

असे चेक करा Aadhar Bank Linking Status

  1. Aadhar Bank Linking Status चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. आधारची वेबसाईट पुढीलप्रमाणे आहे – https://uidai.gov.in/en/
  2. आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “My Aadhar” या ऑप्शनवर क्लिक करावे.
  3. “My Aadhar” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर “Aadhar Services” या पर्यायाखाली 6 व्या क्रमांकावर “Check Aadhar Bank Linking Status” हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.
  4. “Check Aadhar Bank Linking Status” ह्या ऑप्शन वर क्लिक केल्यावर आता नवीन टॅब ओपन होईल. आणि या पेजवर आता तुम्ही तुमचे Aadhar Bank Linking Status चेक करू शकता.
  5. सर्वप्रथम जिथे आधार क्रमांक नमूद करण्यास सांगितले आहे. तिथे तुमचा आधार क्रमांक अचूकरीत्या टाकून घ्यावा.
  6. आधार क्रमांक टाकल्यानंतर पुढे दिलेला Captcha Code टाकून घ्यावा आणि Send OTP या ऑप्शन वर क्लिक करावे.
  7. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी नमूद करावा.
  8. Submit OTP या पर्यायावर क्लिक केल्यावर आता तुमचे Aadhar Bank Linking Status या ठिकाणी दाखवण्यात येईल.
  9. तुमचे Bank Seeding Status, Bank Seeding Date आणि Bank हा सर्व तपशील या ठिकाणी दाखवण्यात येईल.

तर मित्रांनो, अशाप्रकारे तुमचे Aadhar Bank Linking Status तुम्ही तुमच्या मोबाईल वरुनच चेक करू शकता. जर तुमचे आधार बँकेला लिंक असेल तर तुमचा पुढील पीएम किसानचा हप्ता यायला कोणतीही अडचण येणार नाही, परंतु तुम्ही पीएम किसान केवायसी केली नसेल तर मात्र ती करणे गरजेचे आहे. आणि समजा तुमचे आधार बँकेला लिंक नसेल तर मात्र तुम्हाला पुढील हप्ता येण्याआधी तो बँकेत जाऊन लिंक करून घ्यावा लागेल. तरच पीएम किसान योजनेचे पैसे मिळतील.

तर मित्रांनो आजच्या ह्या लेखात आपण अतिशय उपयुक्त माहिती जाणून घेतली आहे. अशाचप्रकारची माहिती नेहमी पाहत राहण्यासाठी आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

close button