राज्य सरकारचा मोठा निर्णय; MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढीव मदत

big news for students taking the mpsc exam

मुंबई: कोरोना काळात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी विविध परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे नुकसान झाले असल्याने त्यांना राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या परीक्षांसाठी एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सरकारच्या या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळामध्ये इतर मुद्द्यांप्रमाणेच ‘एमपीएससी’ (MPSC) विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यांचे झालेले नुकसान हा मुद्दा चर्चेचा ठरला होता. (Big decision of state government; One year incremental assistance to students appearing for MPSC exams)

पुण्यामध्ये ऐन कोरोनाच्या संकटामध्ये ‘एमपीएससी’ च्या परीक्षार्थीनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. या काळात परीक्षाही स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांनी परीक्षा देण्यासाठी वयाची मर्यादा ओलांडली आहे, त्यांचे मोठे नुकसान झाले होते.

हे देखील वाचा »  आधार कार्डमध्ये किती वेळा करता येईल बदल, जाणून घ्या नवे नियम

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘एमपीएससी’ परीक्षार्थीसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. १३ ऑक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत शिफारस मांडण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

हे देखील वाचा »  आता नोटरी वरून होणार खरेदी खत न्यायालयाचा निकाल | Notary Kharedi Khat Nikal update

त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top