वाहनांच्या नंबर प्लेटवरील क्रमांकात मोठा बदल, नवीन Bharat Series लाँच

New Bharat Series BH: केंद्र सरकारने वाहनांच्या नोंदणीसाठी ‘भारत सिरीज’ किंवा ‘बीएच’ (BH) सिरीज जारी केलीय. त्यामुळे आता तुम्ही नोकरी-धंद्यानिमित्त राज्य बदलले, तरी पुन्हा एकदा वाहनाची नोंदणी करावी लागणार नाही.

वाहनांचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावे यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, वाहनांच्या नोंदणीकरिता भारत मालिका (बीएच-सिरीज) ही नवी नोंदणी मालिका सुरु केली आहे.

या नव्या मालिकेची सुरुवात केल्यामुळे, वाहनाचा मालक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यानंतर, त्याच्या वाहनाचा आधीचा नोंदणी क्रमांक बदलून नव्या नोंदणी क्रमांकाच्या नेमणुकीची आवश्यकता उरणार नाही.

Bharat Series information in Marathi

  • संरक्षण विभागात कार्यरत व्यक्ती, केंद्र सरकार/राज्य सरकार/केंद्र तसेच राज्य सरकारचे सार्वजनिक उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या/ संस्था यांच्या कर्मचाऱ्यांना ऐच्छिक तत्वावर  “भारत मालिके” (बीएच-सिरीज)अंतर्गत वाहन नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
  • या सुविधेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनांचे मोटार वाहन शुल्क दोन वर्षे किंवा त्याच्या पटीतील वर्षांकरिता आकारले जाईल.
  • या नव्या सुविधेमुळे व्यक्तिगत मालकीच्या वाहनांना नव्या जागी कार्यान्वित व्हावयाची गरज भासल्यास, भारतातील कोणत्याही राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात मुक्तपणे स्थलांतरित होण्याची सोय झाली आहे.
  • नव्या नोंदणीला चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर, वार्षिक तत्वावर मोटार वाहन शुल्क आकारण्यात येईल आणि ती रक्कम आधीच्या शुल्काच्या निम्मी असेल.
  • कामानिमित्त अनेकांना परराज्यात जावे लागते. त्या राज्यात गेल्यावर एक वर्षांच्या आत पुन्हा एकदा आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागते.
  • त्यासाठीचा खर्च व जून्या आरटीओची एनओसी लागते. त्यामुळे अनेक जण नव्या ठिकाणी वाहनांची नोंदणी करीत नव्हते.
  • 🎫 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काल (शुक्रवारी) ‘भारत सीरिज’ची अधिसूचना जारी केली.
  • त्यानुसार, आता ‘बीएच’ सीरीजची वाहने देशभरात वैध असतील. राज्य बदलले, तरी वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही.
  • 👮🏻‍♀️ संरक्षण कर्मचारी, केंद्र-राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा स्वैच्छिक असेल. ‘bharat series vehicle in marathi’
  • तसेच चार वा त्यापेक्षा अधिक राज्यांत कार्यालये असणाऱ्या खासगी कंपन्यांचे कर्मचारीही या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.

Bharat Series Overview in marathi

विभागाचे नावरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
योजनेचे नावभारत मालिका (BH) वाहनांची नंबर प्लेट
लाँच केलेभारत सरकार
लाँच दिनांक28/08/2021
लाभभारतीय नागरिक
लाभार्थी व्यक्तीसंरक्षण कर्मचारी, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या 4 किंवा अधिक राज्यांमध्ये त्यांची कार्यालये आहेत
नोंदणी मोडऑनलाइन, ऑफलाइन
पासून नोंदणी सुरू15 सप्टेंबर 2021
अधिकृत संकेतस्थळwww.morth.nic.in

आता कसा असेल नंबर?

(बीएच-सिरीज) नोंदणी क्रमांक नमुना पुढीलप्रमाणे असेल –

आता वाहनांची YY BH 4144 XX YY या स्वरुपात नोंदणी होणार आहे. YY म्हणजे पहिले रजिस्ट्रेशन वर्ष, BH- भारत सीरीज, कोड 4-0000 ते 9999, XX- मधली अक्षरे AA to ZZ. उदा. गाडीचा नंबर 21 BH 1234 MH असा असू शकतो. ‘bharat series vehicle in marathi’

 

FOR MORE INFORMATION DOWNLOAD PDF - CLICK HERE

Leave a Comment

close button