Bank Holiday October 2022 – ऑक्टोबरमध्ये बँकांना तब्बल 21 दिवस सुट्टी ऑक्टोबर 2022 महिन्यात सुट्यांचा सुकाळ असून देशातील वेगवेगळ्या भागांत एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे बँक ग्राहकांना कामाचे नीट नियोजन करावे लागणार आहे.
Bank Holiday October 2022
ऑक्टोबर 2022 मध्ये नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. याशिवाय देशाच्या अनेक भागांत स्थानिक पातळीवरील उत्सव आहे. शनिवार रविवारच्या नेहमीच्या सुट्याही आहेतच. त्यामुळे बँकांना सुटी असेल.
22 ते 24 ऑक्टोबर या काळात सलग 3 दिवस बँका देशात सर्वच ठिकाणी बंद राहतील. 22 व 23 रोजी शनिवार-रविवारची सुटी असेल. 24 रोजी लक्ष्मीपूजनानिमित्त बँका बंद राहतील.
ऑक्टोबर सुट्यांची यादी
1 ऑक्टो. – बैंक अकाउंटस हाफ इअर्ली क्लोजिंग डे गंगटोक
2 ऑक्टो. – रविवार व गांधी जयंती सर्व ठिकाणी
4 ऑक्टो. – दुर्गापूजा, दशहरा (महानवमी), आयुधा पूजा, श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव आगरतळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, को कोलकता, लखनौ, पाटणा, रांची, शिलाँग रंग व तिरुवनंतपूरम
5 ऑक्टो. – दुर्गापूजा / दशहरा (विजयादशमी), श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव सर्व ठिकाणी
6 ऑक्टो. – दुर्गापूजा (दशई) -गंगटोक.
7 ऑक्टो. – दुर्गा पुजा (दशई) – गंगटोक,
8 ऑक्टो. – दुसरा शनिवार, मिलाद-ए शरीफ / ईद-ए-मिलाद-उल-नबी सर्व ठिकाणी
9 ऑक्टो. – रविवार सर्व ठिकाणी
13 ऑक्टो. – करवा चौथ सिमला.
14 ऑक्टो. – ईदनंतरचा शुक्रवार जम्मू व श्रीनगर.
16 ऑक्टो.- रविवार सर्व ठिकाणी
18 ऑक्टो. – कटी बिहू गुवाहाटी.
22 ऑक्टो. – चौथा शनिवार सर्व ठिकाणी
23 ऑक्टो. – रविवार सर्व ठिकाणी.
24 ऑक्टो. – कालीपूजा, दिवाळी, लक्ष्मीपूजन / नरक चतुदर्शी – गंगटोक, हैदराबाद व इम्फाळ सोडून सर्व ठिकाणी
25 ऑक्टो. – लक्ष्मीपूजन/दिवाळी, गोवर्धनपूजा गंगटोक, हैदराबाद,इम्फाळ व जयपूर.
26 ऑक्टो. – गोवर्धनपूजा, विक्रम संवत नववर्षदिन, भाऊबीज, दिवाळी (बलिप्रतिपदा), लक्ष्मीपूजन / प्रवेश दिन- मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, देहरादून, गंगटोक, जम्मू, कानपूर, लखनौ, श्रीनगर, नागपूर, सिमला
27 ऑक्टो.- भाऊबीज, चित्रगुप्त जयती, लक्ष्मीपूजन/दिवाळी, निगोल चर्कोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनौ.
30 ऑक्टो. – रविवार सर्व ठिकाणी
31 ऑक्टो. – सरदार वल्लभभाई पटेल जयंती, सूर्य षष्ठी डाला छठ (सकाळचे अर्घ्य)