कृषी मंत्री: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खात्यात पाच दिवसात रक्कम | Ativrushti Nuksan Bharpai Update

Ativrushti Nuksan Bharpai Update – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच दिवसांत रक्कम कृषिमंत्री अब्दुल सत्तार : नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात.

Ativrushti Nuksan Bharpai Update

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था पाहण्यासाठी आलो आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसांत रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिले. शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत मंत्री अब्दुल सत्तार यांनी धारणी तालुक्यातील सादाबाडी या गावात येऊन आदिवासी शेतकरी शैलेंद्र सावलकर यांच्या घरी बुधवारी रात्री मुक्काम केला. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून त्यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, पाथरपूर या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. {Ativrushti Nuksan Bharpai Update}

त्यानंतर सुभाष रामलाल पटेल यांच्या शेतात दुपारचे जेवण घेतले. कृषिमंत्री सत्तार यांच्या या दौऱ्यात आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते.

अन् 5 किमी शेतकरी आत्महत्या

  • कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी बुधवारी रात्रीपासून मेळघाटातील सादाबाडी (ता. धारणी गावात मुक्कामी असतानाच तेथून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लाकटू गावातील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केली.
  • अनिल सूरजलाल ठाकरे (वय 25) असे त्याचे नाव आहे. कजन घेतलेल्या ट्रॅक्टरचा मासिक हप्ता भरायला पैसे नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले.
  • मंत्री सत्तार यांनी अनिल ठाकरे याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. शेतकऱ्यांची व्यथा पाहून डोके सुन्न झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी याप्रसंगी दिली. “Ativrushti Nuksan Bharpai Update”

Leave a Comment

close button