शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रू. नुकसान भरपाई मिळणार, अतिवृष्टी भरपाई जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra – अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत; एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करणार.

गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार एनडीआरएफ च्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. [Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra]

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

मदत दुप्पट अन् तीही तीन हेक्टरपर्यंत..! अतिवृष्टीग्रस्तांना सरकारचा मोठा दिलासा. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त जिरायती (कोरडवाहू) शेतकऱ्यांना दुप्पट आणि तीन हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी, महापुराचा फटका बसलेला असताना सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मंगळवारच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात झाली. तीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या मदतीपोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली. {Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra}

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना (जिरायती) हेक्टरी 6800 रुपये प्रमाणे मदत राष्ट्रीय आपत्ती मदत निधीच्या निकषानुसार दिली जाते आणि ही मदत दोन हेक्टरपर्यंतच आतापर्यंत दिली जात होती. यापुढे ही मदत हेक्टरी 13 हजार 600 रुपये इतकी दिली जाईल आणि ती तीन हेक्टरपर्यंत देण्यात येणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीतजास्त 40 हजार 800 रुपये इतकी मदत मिळू शकेल. बागायती शेतीला वाढीव मदत देण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली नाही. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

मदत दुप्पट अन् तीही तीन हेक्टरपर्यंत

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी जिरायती शेतीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी हेक्टरी 10 हजार रुपये मदत देण्यात येत होती.

आतापर्यंत कधीही दिली गेली नाही एवढी मदत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. राज्यात यंदाच्या अतिवृष्टीने १५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आजच्या निर्णयाने शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल.

जिरायती शेतीसाठी हेक्टरी 75 हजार रुपये आणि बागायती शेतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपये नुकसानभरपाई सरकारने द्यावी, अशी आमची मागणी आहे. आजच्या निर्णयाने शेतकयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तीन हेक्टरची मर्यादादेखील काढायला हवी. आजच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा. “Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra”

शेतकऱ्यांना किती हेक्टर मर्यादेत मदत मिळेल?

शेतकऱ्यांना आता दोन ऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत मिळेल

शेतकऱ्यांना आता जास्तीत जास्त किती मदत मिळू शकते?

एक हेक्टरी 13 हजार 600 रुपये प्रमाणे तीन हेक्टर पर्यंत 40 हजार 800 रुपये मिळेल.

Leave a Comment

close button