assk pune.setuonline Registration Aaple Sarkar Seva Kendra Pune मा.माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक 19-01-2018 चे शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत.
त्यानुसार पुणे जिल्हयातील सर्व नागरिकांना CSC-SPV चे केंद्र मिळणविणेसाठी विहीत केलेल्या अटी व शर्ती पुर्ण करित असेल अशा व्यक्तींना सुचित करण्यात येते की, सदरचा जाहिरनामा व अर्जाचा विहीत नमुना व अटी व शतींबाबतची माहिती तसेच ग्रामीण भागा करिता 639, शहरी भागामधील पुणे महानगर पालिका- 74, पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 45, नगरपालिका- 15, कटकमंडळ- 8, असे एकूण 781 ठिकाणांची यादी www.pune.gov.in व https://asskpune.setuonline.com या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देणेत आलेली आहे.
आपले सरकार सेवा केंद्राकरिता ऑनलाईन asskpune.setuonline.com या संकेतस्थळावर भरावा. दिनांक 03-02-2022 नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
आपले सरकार सेवा केंद्र पात्रता व कागदपत्रे
- अर्जदार हे ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्यासाठी ज्या गावातून (….गावाचे नाव……..ता..जि.पुणे, पिन कोड सहीत) /नगरपालिका प्रभाग/कटक मंडळ/ महानगरपालिका प्रभागामधून अर्ज करीत आहे त्याच गावातील रहिवासी असावा.
- रहिवासाबाबत खालील कागदपत्रांची साक्षांकित प्रत सोबत जोडावी – आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, पोस्ट ऑफिस पासबुक, वाहन चालक परवाना, मिळकत कर पावती, लाईट बील (मागील तीन महिन्यातील कोणतेही एक), दुरध्वनी बील (मागील तीन महिन्यातील कोणतेही एक), पाणीपट्टी पावती, शस्त्र परवाना, राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजनेचे ओळखपत्र (मनरेगा).
- अर्जदाराकडे स्वतःचे भाड्याने घेतलेले दुकान अथवा जागा असावी. अर्जदार ज्या ठिकाणी केंद्र चालवणार आहे त्या ठिकाणचा स्वतःच्या नावाचा 712, प्रॉपर्टी कार्ड किंवा ज्या ठिकाणी अर्जदार केंद्र चालवणार आहे त्या ठिकाणचा अर्जदार आणि मुळ जमिन मालक यांच्यातील भाडेकरार पत्र सोबत जोडावे.
- अर्जदार कमीत कमी 10 वी पास असावा. शैक्षणिक पात्रते बाबतची कागदपत्रे – एसएससी सर्टिफिकेट, एचएससी सर्टिफिकेट, पदवीधर सर्टिफिकेट.
- अर्जदार यांना किमान संगणकीय ज्ञान असले बाबत MS-CIT, CCC, GCC-TBC, GCC-SSD-CTC अथवा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडील संगणकीय कोर्सेस प्रमाणपत्र आवश्यक. किंवा संगणक/माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी/पदविका धारण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अर्जदार यांचेकडे स्वतःचा कमीतकमी 1 कॉम्प्युटर लॅपटॉप, 1 प्रिंटर, 1 स्कॅनर, 1 बायोमॅट्रिक, 1 वेब कॅमेरा असावा.
- अर्जदार यांचेकडे चांगल्या दर्जाची इंटरनेट व्यवस्था असावी. assk pune.setuonline Registration Aaple Sarkar Seva Kendra Pune 2022
- अर्जदार यांचा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांचा (अर्जदार रहात असलेल्या पोलीस स्टेशनचा) चारित्र्य पडताळणी अहवाल किंवा संबंधीत पोलीस स्टेशनला चारित्र्य पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची संबंधीत पोलीस स्टेशनची पोहच पावती जोडणे आवश्यक राहील.अर्जदार यांनी केंद्र वाटप झालेनंतर तीन महिन्याचे आत चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे बंधनकारक राहील अन्यथा वाटप केलेला आदेश रद्द समजणेत येईल.
- अर्जदार यांचे नावे असलेला गुमास्ता परवाना (Shop Act License) (अर्जदार यांचेकडे पुर्वीपासून असेल तर त्यांनी सादर करावा. आणि नसल्या संबंधीत अर्जदार यांनी तीन महिन्याच्यात सादर करणे बंधनकारक आहे.
आपले सरकार सेवा केंद्र मिळणेकामीच्या अटी व शर्ती
- शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्राकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (Software) इ. योग्य वापर, संरक्षण व जतन करणे आवेदकांना बंधनकारक राहील.
- आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे.
- केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करणेत येईल. assk pune.setuonline Registration Aaple Sarkar Seva Kendra Pune 2022
- कुटूंबातील एका सदस्याला जिल्ह्यामध्ये (शहरी किंवा ग्रामीण भागात) फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. (एका पेक्षा जास्त केंद्रासाठी अर्ज भरल्यास एकाच केंद्रास नियमानुसार मान्यता देणेत येईल.)
- ग्रामीण व शहरी भागात सदर जाहीरनाम्याव्दारे प्रसिध्द केलेल्या रिक्त जागेसाठीच अर्ज सादर करावा. त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणासाठी मागणी केलेस आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच केंद्र चालकास आवश्यक ते अहवाल तात्काळ सादर करावे लागेल.
- शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून ऑनलाईन पध्दतीने देणे अनिवार्य राहील.
- याबाबत नागरीकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर स्वरूपाची नोंद घेण्यात येईल व चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
- निर्गत केलेल्या दाखल्याच्या प्रमाणपत्राच्या स्थळप्रती पुढील महिन्यात संबंधित उपविभागीय अधिकारी/तहसिल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.
- अर्जामध्ये भरलेली माहिती चूकीची अथवा खोटी आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणेत येईल.
- सदरचे आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत रक्कम रु.300/- ही शासकीय फी + नियमानुसार GST भरावी लागेल. assk pune.setuonline Registration Aaple Sarkar Seva Kendra Pune
आपले सरकार सेवा केंद्र कामी रहिवासी घरमालकाचे लाईट बील होवु शकते का?