आशा सेविकांच्या मानधनात 1200 रुपयांची वाढ | Asha Sevika Mandhan 2022

Asha Sevika Mandhan 2022 राज्यभरातील ६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात दरमहा एक हजार रुपये तर गट प्रवर्तकांच्या मानधनात दरमहा बाराशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Asha Sevika Mandhan 2022 Extended

आशा सेविकांच्या मानधनात 1200 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं.

तसेच आशासेविकांना आंदोलनानंतर जसं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जुलै 2022 पासून ही वाढ लागू करण्यात येईल, असंही आश्वासन दिलं.

नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ 

तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांच्या परवानगीसाठी आता १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. जादा विद्याशाखा, नवीन विषय आणि ज्यादा तुकड्या सुरु करण्यासंबंधीचे हे अर्ज आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये संस्था बंद करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनांनादेखील १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

 

अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन देणार

कृषी वर आधारीत अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ अंतर्गत सुधारित प्रोत्साहने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. गुंतवणुकीच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तरतुदीतून या उद्योगांना सूट देण्यात आली आहे.

फॅमिली कोर्ट न्यायाधीशांना सुधारित वेतनश्रेणी

कुटुंब न्यायालयातील न्यायाधीशांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

शेट्टी आयोगाच्या शिफारशीनुसार १ जुलै १९९६ पासून व न्या. पद्मनाभन समितीच्या शिफारशीनुसार कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त झालेल्या न्यायाधीशांना, जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश) तसेच सरळसेवेने नियुक्त झालेल्या जिल्हा न्यायाधीश निवड श्रेणी व जिल्हा न्यायाधीश (उच्च समयश्रेणी) या वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली.

Leave a Comment

close button