आशा स्वयंसेविका करिता आता ‘आशा घर’ योजना

रांझणी: आशा स्वयंसेविकांसाठी आशा ‘घर’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठी प्रति आशा कर्मचारीवर 25 हजार रूपये खर्च करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. (‘Asha Ghar’ scheme for Asha Swayamsevak)

2007 पासून ग्रामीण व शहरी भागात आशा योजनेत आशा स्वयंसेविका काम करीत असून, त्यांना कामावर आधारित मोबदला अदा करण्यात येत असतो.

आशांना निश्चित करण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना घेऊन त्यांना शासकीय आरोग्य संस्थेत यावे लागते.

जोपर्यंत लाभार्थीची प्रसूती होत नाही किंवा रुग्णांच्या आजाराचे निदान होत नाही तोपर्यंत आशांना आरोग्य संस्थेत उपस्थित राहावे लागत असते.

अशावेळी उशीर झाल्यास रात्रीच्यावेळी गावाकडे जाण्याची व्यवस्था नसल्याने आशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ही बाब लक्षात घेता 2021-22 च्या पीआयपीमध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये ‘आशा घर’ तयार करण्यात येणार असून, यात एक स्वतंत्र खोली असणार आहे.

आशा घराची वैशिष्ट्ये:

 • स्वतंत्र खोली राहणार आहे
 • त्या खोलीत बाथरूम व प्रसाधनगृहाची व्यवस्था पाणीपुरवठा
 • विद्युतपुरवठा
 • तसेच रंगरंगोटी करण्यात येणार आहे

या खोलीस ‘आशा घर’ अशी नेमप्लेट लावण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.

आशा घरात हे साहित्य राहणार आहे:

 1. लोखंडी पलंग
 2. पंखा
 3. गादी
 4. चादर
 5. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
 6. टॉवेल
 7. साबण
 8. नॅपकिन
 9. ताट
 10. वाटी
 11. पाणी पिण्याचा ग्लास
 12. पाणी साठवण्याकरिता जार
 13. टी-टेबल
 14. बकेट
 15. जार

इत्यादी साहित्य आशा घरात राहणार आहे. ‘Asha Ghar Yojana Maharashtra’

Leave a Comment

close button