Arogya Bharti Maharashtra 2022 Update – राज्य सरकारचा मोठा निर्णय – आरोग्य विभागात होणार 10 हजार पदांची भरती.
Arogya Bharti Maharashtra 2022 Update
तुम्हाला माहिती असेल, जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या 13 हजार जागांसाठी मार्च 2018 मध्ये भरती निघाली होती. मात्र, कोरोनामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे व त्यानंतर महापोर्टलच्या रद्द होण्याने ही भरती प्रक्रिया रखडली होती.
मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारने आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे – पुढच्या 2 महिन्यांत आरोग्य विभागात 10,127 जागांसाठी भरती होईल.
त्यासाठी फेब्रुवारी, मार्च दरम्यान परीक्षा घेऊन या जागा भरणार असल्याचे आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे – तसेच भरतीचे नवे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे
💁♀️ असे असेल वेळापत्रक
● 1 ते 7 जानेवारी 2023 – आरोग्य भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल.
● 25 ते 30 जानेवारी – उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल.
● 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी – पात्र उमेदवारांची यादी जाहीर
● 25 व 26 मार्च – विविध पदांसाठी भरती परीक्षा होईल
● 27 मार्च ते 27 एप्रिल – पात्र उमेदवारांची निवड